राज्यातील एसटी बस आगारांचा कायापालट करणार…

मुंबई : स्वच्छ बस (bus)स्थानक, सुंदर व निटनेटका बसस्थानक परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहाची सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी प्रशासनाचे मुलभूत कर्तव्य आहे. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवून राज्यभरातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करणे हा आमचा उद्देश आहे, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. त्यांनी शुक्रवारी पनवेल व खोपोली बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

प्रवासी सेवेमध्ये प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बसस्थानक, बस(bus) स्थानकाचा परिसर आणि तेथील प्रसाधनगृहे पुरवणी याला भविष्यात आमच्याकडून प्राधान्य देण्यात येईल. याबरोबरच प्रत्येक आगारात चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांसाठी असलेली विश्रांतीगृह देखील स्वच्छ आणि निटनेटकी असावेत यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. प्रवाशांच्या वाहतुकीची गैरसोय करून परिवहन विभाग व अन्य विभागांनी बस स्थानकाच्या परिसरात अडगळीत टाकलेली स्क्रॅप वाहने इतर ठिकाणी उचलून न्यावीत, असे निर्देश दिले.

भेटीमध्ये मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकावरील प्रसाधनगृहाला भेट देऊन तेथील प्रशासनाला अस्वच्छतेबाबत खडेबोल सुनावले. तसेच बसस्थानकावरील आरक्षण खिडकी, पिण्याच्या पाण्याचे सोय याची पहाणी केली. फलाटावर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच त्यांच्या तक्रारीचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश उपस्थित एसटी अधिकाऱ्यांना दिले.

भेटीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबर पनवेल ते खोपोली या मार्गावर एसटीच्या लालपरीतून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. बसमधील सहप्रवासी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिक सर्वसामान्य प्रवासी यांनी बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, बसेस स्वच्छ व यांत्रिक दृष्टीने निर्दोष असावेत, अशी मागणी केली.

हेही वाचा :

मोठी बातमी! नव्या वर्षात शिक्षकांचा पगार लांबणीवर पडणार

‘हे सगळं करण्याची काय गरज होती?’ विराटच्या ‘त्या’ कृतीवर भडकले इरफान आणि गावसकर…Video

जॅकलीन फर्नांडिससाठी सुकेश चंद्रशेखर बनला सांताक्लॉज; तुरुंगातून लिहिलं पत्र, दिली खास भेट!