महागाईचा अजून एक धक्का! एसटी प्रवास ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार

विधानसभा निवडणूक होताच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे धक्के बसत आहेत. आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. अशातच आता एसटीच्या(st) तिकिटात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना लालपरीने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत.

‘गाव ते एसटी’ हे ब्रीदवाक्य समोर ठेऊन काम करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने लालपरीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. कारण गेल्या तीन वर्षांमध्ये भाडेवाढ करण्यात आले नसल्याचे कारण सांगत एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता एसटी(st) महामंडळाच्या प्रशासनाकडून 14.3 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. म्हणजेच प्रवाशांना आता 100 रुपयांच्या तिकिटांमागे 15 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

याशिवाय एसटी महामंडळाने यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन शासनाकडे देखील पाठवला आहे. त्यामुळे आता महायुतीचे सरकार तो निर्णय मान्य करणार की फेटळून लावणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत अडकले आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाला शासनाने दिलेल्या सवलतीवर पैसे खर्च करावे लागणार आहेत. मात्र ते पैसे देखील आता एसटी प्रशासनकडे नाहीत. मात्र या कारणामुळेच ही भाडेवाढ करणे प्रशासनाला अनिर्वाय आहे.

दरम्यान, आता भाडेवाढीचा निर्णय घेतल्याशिवाय काही पर्याय नसल्याचं राज्य परिवहन महामंडळाने म्हंटले आहे. तसेच एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण झाले असते तर ही अडचण ओढवली नसती असं एसटी कर्मचारी संघटनेचे नेते श्रीरंग बर्गे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार? ‘या’ बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

‘पिक्चर अभी बाकी है’; युगेंद्र पवारांची मोठी मागणी, अजित पवार अडचणीत?

BSNL धमाकेदार प्रीपेड प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार 160 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरचं काही