राज्य सरकारचा मोठा निर्णय: प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले अध्यक्ष

महाराष्ट्र सरकारने(govt) आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना या प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रतापगड किल्ल्याच्या विकासासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि विशेष निमंत्रित सदस्य विजय नायडू यांचाही प्राधिकरणावर समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून या प्राधिकरणासाठी आदेश जारी केला आहे.

प्रतापगड किल्ला हा 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार बांधला गेला होता आणि 10 नोव्हेंबर 1659 रोजी या किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजलखानाचा वध केला होता. या ऐतिहासिक किल्ल्याच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

प्राधिकरणाच्या सदस्यांमध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त, साताऱ्याचे जिल्हाधिकारी, पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रादेशिक संचालक, आणि पुणे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक यांचा समावेश असेल. यामुळे किल्ल्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळाचे सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

सुप्रिया सुळेंनी अजित पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण उत्तर मिळालं नाही; सरकारवर केल्या कडव्या टिप्पण्या

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनलने सुरु करताच गाजवले महाविक्रम..

सांगली विधानसभा निवडणुकीत रस्सीखेच; जयश्री पाटील यांनी केलेले निर्णायक जाहीर