‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय! आता फक्त 99 रुपयांमध्ये मिळणार दारु

मद्यप्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता दारुचा(alcohol) कोणताही ब्रँड फक्त 99 रुपयांमध्ये मिळणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील चंद्राबाबू नायडू सरकारने 99 रुपयांमध्ये दारुचा कोणताही ब्रँड देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आंध्र प्रदेश सरकारने अधिसूचना देखील जारी केली आहे.

आंध्र प्रदेश सरकारने दारुच्या(alcohol) संदर्भात एक नवीन धोरण जाहीर केलं आहे. यामाध्यमातून सरकारने कोणताही दारुचा ब्रँड हा फक्त 99 रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आंध्र प्रदेशमध्ये घसरलेल्या दारूच्या विक्रीवर नियंत्रण ठेवता येण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

याशिवाय वाढत्या किंमती देखील आटोक्यात आणण्याचा हा प्रयत्न असणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने यासंदर्भात नवीन मद्य धोरणाची अधिसूचना देखील जारी केली आहे. चंद्राबाबू नायडू सरकारने राज्यातील दारूच्या किंमती कमी केल्यामुळे स्थानिक कंपन्यांना स्वस्त ब्रँडेड दारू बनवण्याची संधी देखील मिळेल असा दावा राज्य सरकारने केला आहे.

आंध्र प्रदेश सरकारने दारूच्या किंमती कमी केल्यामुळे राज्यात 3736 दारुची दुकानेही उघडली जाणार आहेत. तसेच या नवीन उत्पादन शुल्क धोरणातून आंध्र प्रदेश सरकार सुमारे 5500 कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे हे नवीन धोरण येत्या 12 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

उत्पादन शुल्क धोरणाची अधिसूचना जारी करताना आंध्र प्रदेश राज्य सरकारने दावा केला की, ते हरियाणासारख्या राज्यांपासून प्रेरणा घेऊन हे धोरण तयार केले आहे. तसेच आता राज्यात दारुची दुकाने देखील खाजगी झाली आहेत. त्यामुळे आता राज्यात ब्रँडेड मद्य फक्त 99 रुपयांना किंवा त्याहून स्वस्त देखील मिळणार आहे.

हेही वाचा :

‘हा’ स्पर्धक ठरणार ‘बिग बॉस’ मराठी 5 चा विजेता?

T-20 मधील जगातील अव्वल गोलंदाज लग्नबंधनात अडकला

आईच्या जीववर उठला मुलगा, फोन हिसकावताच डोक्यात घातली बॅट, Video Viral