अर्थसंकल्पाआधी शेअर बाजार सुसाट, सेन्सेक्स आणि निफ्टीची सकारात्मक सुरूवात

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार असल्याने शेअर मार्केटमध्ये(Stock market) चढ-उतार दिसून येत आहेत. शेअर मार्केटची सुरुवात आज सावध गतीने झाली असून, सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये निफ्टी २० अंकांनी वाढून आणि सेन्सेक्स ५० अंकांनी वाढून उघडले.

सध्या निफ्टी २३५०० च्या वर आणि सेन्सेक्स २०० अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे. बाजारावर(Stock market) दबाव दिसत असला तरी काही सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. RVNL आणि IRB चे शेअर्स ५ टक्क्यांनी वधारले आहेत. त्याचप्रमाणे माझगाव डॉक, BDL आणि एनएचपीसीच्या शेअर्समध्येही वाढ पाहायला मिळत आहे.

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्येही तेजी दिसून येत आहे. अदानी पॉवरचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले असून, अदानी ग्रीनमध्ये ३.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. अदानी इंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये २.४६ टक्क्यांनी वाढ होत आहे.

दुसरीकडे, BSE सेन्सेक्सच्या टॉप ३० शेअर्सपैकी ९ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. NSE च्या ५० शेअर्समध्ये आयटीसी हॉटेल्स, महिंद्रा अँड महिंद्रा, BEL, आणि अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्समध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, NSE टॉप ५० पैकी २३ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

एकूणच, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये सावध गुंतवणूकदारांचे वातावरण असून, सरकारी कंपन्या आणि अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी आहे, तर अन्य काही क्षेत्रांमध्ये घसरण दिसून येत आहे.

हेही वाचा :

‘दोन्ही शिवसेना जोडण्याची वेळ आली आहे…’;शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

सांगली : आठ व नऊ फेब्रुवारीला शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषद

माघी गणेश जयंतीला जुळून आला शिव योग; वृषभसह ‘या’ 5 राशींवर बाप्पा होणार प्रसन्न