ट्रम्प यांचा दणका.. कंगाल झाले शेअर बाजारातील महारथी, 40 दिवसात बुडाले हजारो करोडो रुपये

या आठवड्याच्या सुरूवातीपासून भारतीय शेअर बाजारात(Stock market) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. आज देखील भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

आज बीएसई सेन्सेक्स 76171.08 वर बंद झाला तर निफ्टी50 26.55 अंकांच्या घसरणीसह 23045.25 वर बंद झाला आहे. तर दुसरीकडे 2025 मध्ये आतापर्यंत निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक अनुक्रमे 11 टक्के आणि 14 टक्क्यांनी घसरले आहेत जे 2016 नंंतर सर्वात मोठी घसरण आहे. तर परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे 2025 मध्ये आतापर्यंत शेअर बाजारात तब्बल 10 अब्ज डॉलर्सचा नुकसान झाला आहे.
भारतीय शेअर बाजारात(Stock market) सतत होणाऱ्या घसरणीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर शेअऱ बाजारातील तेजी देखील संपली आहे. माहितीनुसार 2025 मध्ये भारतीय शेअर बाजारातील टॉप 10 बुल्सना आतापर्यंत 6,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेअर बाजारात सुरु असणाऱ्या घसरणीमुळे शेअर बाजारातील 10 सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांना देखील मोठे नुकसान झाले आहे. यात पहिले नाव म्हणजे राधाकिशन दमानी आहे. दमानी यांचे 2025 मध्ये आतापर्यंत अंदाजे 4273 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर आशिष धवन यांना देखील घसरणीमुळे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यांना 2025 मध्ये आतापर्यंत 318 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर झुनझुनवाला कुटुंबाला 6,051 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर आशिष कचोलिया यांना आतापर्यंत 324 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तर मुकुल अग्रवाल यांना 884 कोटी रुपयांचे, आकाश भन्साळी यांना 932 कोटी रुपयांचे, नेमिश शाह यांना 462 कोटी रुपयांचे, मधुसूदन केळे यांना 506 कोटी रुपयांचे, विजय केडिया यांना 278 कोटी रुपयांचे आणि सुनील सिंघानिया 515 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
तर दुसरीकडे गेल्या महिन्यात शेअर बाजारात सर्वात जास्त नुकसान निफ्टी50 मध्ये गुंतवणूकदारांना सहन करावा लागला आहे. निफ्टी 50 मध्ये गेल्या आठवड्यात ट्रेंट लिमिटेडमध्ये 20.4 टक्क्यांची घसरण झाली आहे तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 14.6 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे आणि याचबरोबर एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेडमध्ये 14.1 टक्के घसरण आणि टाटा मोटर्समध्ये 12.3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे.
हेही वाचा :
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला मोठा निर्णय!
गजब बेइज्जती है यार…! हस्तांदोलनासाठी मोदींकडून हात पुढे, पण फ्रान्सच्या अध्यक्षांचं दुर्लक्ष
एकनाथ शिंदेचं ‘मिशन टायगर ‘ कामयाब; ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र,’ राजन साळवी हाती धनुष्यबाण घेणार