विचित्र कृत्य! रीलसाठी श्वानाचे दूध पिऊ लागली तरुणी, व्हिडिओ व्हायरल

आजकाल लोक सोशल मीडियाच्या पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे. (dog)विशेषत: तरुण पिढी इन्स्टाग्राम रील्सपासून यूट्यूब शॉर्ट्सपर्यंत व्हिडिओ बनवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. हे निराधार व्हिडीओ व्हायरल होत राहतात, पण कधी कधी यामुळे व्हिडीओ बनवणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात येतो तर काही वेळा त्यांना आपला जीव देखील गमवावा लागतो. असे असूनही व्हायरल होण्याच्या हव्यासापोटी कोणताही धोका पत्करण्यास तरुण तयार आहेत. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी कुत्रीचे दूध पिताना दिसत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवली दिली असून लोक त्यावर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक मुलीला ट्रोल करत आहेत, तर काहीजण याला गंभीर सामाजिक समस्या असल्याचे म्हणत आहेत. व्हिडिओतील दृश्ये पाहून तुम्हीही डोक्याला हाथ लावल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओसाठी आता या तरुणीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्री जमिनीवर पडलेली दिसत आहे. कुत्रीने तिचे पाय वर केले आहेत. एका मुलीने कुत्र्याच्या स्तनाला तोंड लावले (dog)आहे. यावेळी ही तरुणी कुत्रीच्या स्तनातून दूध पिऊ लागते. हा धक्कादायक प्रकार पाहून आता सोशल मीडिया युजर्स आवाक् झाले आहेत. येत्या काळात असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात लोक प्राण्यांसोबत दूरव्यवहार करताना दिसून आले. अशात यावर कठोर ते पाऊल उचलणे फार गरजेचे आहे.

तरुणीचा हा व्हिडिओ नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला बऱ्याच लोकांनी पाहिले असून लोक यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “यामुळे रेबीस होऊ शकते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रिल्सने लोकांची (dog)विवेक बुद्धि नष्ट केली आहे”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कदाचित तिने लहानपणी दूध प्यायले नव्हते, म्हणूनच संधी मिळाली तर ती पिऊ लागली”.

हेही वाचा :

सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली घट; काय आहेत 22,24,18 कॅरेटचे भाव, जाणून घ्या

राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

एकनाथ शिंदेंकडे गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ; देवेंद्र फडणवीसांकडे कोणतं खातं?