गळा दाबला, कपडे काढले…; इस्रायलच्या महिला पर्यटकासह होमस्टेच्या मालकीणवरही अत्याचार

कर्नाटकातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हम्पीजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सनापूर जलायशाजवळ इस्रायलच्या एका 27 वर्षीय पर्यटकासह दोन महिलांवर(female) बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुसरी पीडित तरुणी ‘होमस्टे’ ची मालकीण आहे.

पीडितांवर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना गुरुवारी रात्री, 6 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता घडली. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
29 वर्षीय होम स्टे ऑपरेटर आणि तीन पुरूष पर्यटक आणि एक इस्त्रायली महिला(female) पर्यटक हे तुंगभद्रा सनापूर जलायशाजवळ आले होते. हे सर्वजण कॅनलजवळ बसले होते आणि गिटार वाजवत गाणं बोलत होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपीने प्रथम पेट्रोलबद्दल विचारले. आम्ही त्यांना जवळपास पेट्रोल पंप नाही असं सांगितल्यानंतर त्यांनी 100 रुपयांची मागणी केली.
आम्ही त्यांना ओळखत नव्हतो, म्हणून आम्ही पैसे नाहीत, असं सांगितले. मात्र त्यानंतरही आरोपी वारंवार पैशासाठी आग्रह करत असल्याने ओडिशातील एका पुरूष पर्यटकाने त्यांना 20 रुपये दिले. यानंतर, तिघांनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि तिच्या डोक्यावर दगड मारण्याची धमकी दिली. या वादानंतर दोन व्यक्तीने मारहाण करत होमस्टे ऑपरेटर आणि इस्त्रायली महिलेवर बलात्कार केला. तर तिसऱ्या व्यक्तीने एका पुरूष पर्यटकाला कॅनलमध्ये ढकलून दिल्याचं पीडितने तक्रारीत म्हटलं आहे.
दोन आरोपी मिळून मला कॅनेलच्या बाजूला ओढत घेऊन गेले. त्यांच्यापैकी एकाने माझा गळा दाबला आणि माझे कपडे काढले. एक एक करून त्यांनी मला मारहाण केली आणि माझ्यावर बलात्कार केला, असे होमस्टे ऑपरेटरने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच अशाच पद्धतीने आरोपींपैकी एकाने इस्त्रायली महिलेला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केल्याचंही तिने सांगितलं आहे.
दरम्यान, घटनास्थळी एक दुचाकी, कॅमेऱ्याची बॅग, पॉवर बँक, पेन, तुटलेला गिटार, सिगारेट आणि रक्ताने माखलेले कपडे आढळून आले. पोलीस अधिक्षक राम अरसिड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या गुन्ह्यांच्या तपासासाठी सहा पथके नेमली गेली आहेत.
हेही वाचा :
होळीआधीच महाराष्ट्रात उष्णतेची दुसरी लाट; ‘या’ ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट
भरचौकात तरुणावर सपासप वार करत हत्या, दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड
कोल्हापूरजवळ BMW पार्क करून युवकाची धक्कादायक कृती; भाड्याच्या कारमध्ये घेतला धक्कादायक निर्णय!