ना रांगा, ना Waiting… विधानसभेला होणार सुपरफास्ट वोटींग!
लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी उडालेल्या गोंधळानंतर, केंद्रीय निवडणूक(Legislative) आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदार केंद्रांची संख्या वाढवण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अनेक मतदान केंद्रांवर(Legislative) मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकाच मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढल्याने हा गोंधळ झाला होता. राजकीय पक्षांनी याची दखल घेतली आणि मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या मागणीला मान्यता देत एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1500 मतदार ठेवण्याची सूचना दिली आहे. या निर्णयामुळे विधानसभेला मुंबईबरोबरच राज्यातील नागरिकांना गोंधळविरहित मतदानाचा अनुभव येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांबद्दल माहिती देण्यात आली. मतदार केंद्रांवरील कॉर्डिनेशन अधिक सुरळीत व्हावे आणि मतदानाच्या दिवशी गोंधळ होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, ज्या मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या जास्त आहे, त्यांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना मतदानासाठी अधिक वेळ वाट पाहावी लागणार नाही आणि प्रक्रिया जलदगतीने पार पडेल.
मतदान केंद्राचं विभाजन करताना भौगोलिक एकसंघता अबाधित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, वाढीव मतदारांना त्याच इमारतीमधील अन्य मतदान केंद्रांवर स्थलांतरित करणे आवश्यक आहे, जेणेकरून मतदारांना कोणत्याही असुविधेचा सामना करावा लागू नये.
या नव्या सूचनांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक केंद्रावर सुपरफास्ट मतदान शक्य होईल आणि नागरिकांना गोंधळविरहित मतदानाचा अनुभव येईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर गडगडले
विधानसभेआधीच काडी! भाजपाच्या बैठकीत शिंदे-राष्ट्रवादी विरोधी सूर
हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुनही हटवणार?