अरविंद केजरीवाल यांना सुप्रिम कोर्टाकडून अंतिरीम जामीन मंजूर, तरीदेखील तरुंगातच राहणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रिम कोर्टाने अंतिरीम जामीन(Supreme Court) मंजूर केला आहे. जोपर्यंत हे प्रकरण मोठा पिठासमोर सुनावणीसाठी असणार आहे तोपर्यंत हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आता सर्वोच्च न्यायालयाचे(Supreme Court) तीन न्यायाधीशांचं खंडपीठ केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश तीन न्यायाधीशांची नियुक्ती करतील. या प्रकरणाची मोठ्या खंडपीठासमोर सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मात्र, केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत, पण त्यांना ईडी प्रकरणात जामीन मिळाला आहे. अशा परिस्थितीत तो सध्या तुरुंगातच राहणार आहे.

अरविंद केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी सांगितलं की, सीबीआय प्रकरणी 18 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या प्रकरणातील निर्णयानंतरच केजरीवाल बाहेर पडतील की नाही हे कळेल. मात्र, केजरीवाल तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता प्रबळ आहे.

हेही वाचा :

​खुशखबर! सोन्या-चांदीच्या भावात आली स्वस्ताई

ना साडेसाती, ना वक्री चाल! ‘या’ राशीचे लोक अल्पावधीतच होतात मालामाल

विधानपरिषद निवडणुकीत मोठा घोडेबाजार, ‘मविआ’चे अनेक आमदार फुटल्याची चर्चा