आमच्या भावाने मागितलं असतं तर सर्व देऊन टाकलं असतं; सुप्रिया सुळे गरजल्या, हातातल्या बांगड्याही दाखवल्या!

सांगली: अनेकजण भाषण लिहून येतात, पण मी भाषण लिहून घेत नाही. दुसऱ्याने लिहिलेली भाषण मी वाचत नाही. मी जे बोलते ते मनातलं बोलते, असं शरद पवार(current politics) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांची आटपाडीत सभा घेतली.

खानापूर-आटपाडी-विसापूर हे भाग मिळून बनलेल्या चार नंबरच्या आकड्याचा योगायोग देखील सुप्रिया सुळेंनी(current politics) सांगितला. खानापूर 4, आटपाडी 4, विसापूर 4… आणि वैभव पाटील यांचा नंबरही 4…त्यामुळे विजय निश्चित आहे, असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं. पुढच्या पाच वर्षात महागाई वाढवणार नाही हा शब्द विरोधकांनी द्यावा, हा शब्द उद्धव ठाकरेंनी मात्र दिलेला आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्यातील मी सर्वात लाडकी बहीण आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मात्र मी लाडकी नव्हते. आमच्या भावाने मागितलं असतं तर असेल नसेल तेवढं मी हसत-हसत दिलं असतं. माझ्यावर लाडकी बहीणवरून टीका होते की, या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यात. त्यामुळे त्यांना लाडकी बहिणी योजनेचे काय वाटणार नाही.

हो, माझा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झाला आहे. पण यात माझी काय चूक आहे?, माझ्या हातात असलेल्या सोन्याच्या बांगड्या या शारदाबाई पवारांची आठवण आहे, या बांगड्या माझ्या कुटुंबाच्या कष्टाच्या कमाईचे आहेत, त्यांना ईडी, सीबीआयची भीती वाटणार नाही, असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला.

भारतीय जनता पक्ष चांगला पक्ष होता. पण संगत चुकीची लागली, मित्र पक्षांची देखील संगत चुकीची लागली. भारतीय जनता पक्षाचे मंत्री लोकांना लाथ मारून जातात. आम्ही नुसते लाडकी बहीण योजना सारखी योजना राबवणार नाही तर महिलांना आम्ही महालक्ष्मी म्हणू…राजश्री शाहूंच्या भूमितील खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांच्याबाबत चुकीची भाषा वापरली, त्या त्यांच्या संगतीचा परिणाम आहे, ते आधी चांगले होते.

कोणत्याही महिलेचा चोरून फोटो काढणे हा गुन्हा आहे. धमकी कुणाला देत आहेत?, देवाभाऊ कुठे आहात तुम्ही?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. आर.आर. पाटील आज गृहमंत्री असते तर अशी वक्तव्य करणाऱ्यांना जाब विचारला असता, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितले.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांच्या जावयासह मंत्र्यांच्या घरांवर हल्ला, 5 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी

मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; अंगावार खुर्च्या फेकल्या

प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमाननतळावर ताफा अचानक जागेवर थांबला!