आकाशात घडलेलं आश्चर्य: पक्षाच्या पोटातून मासा बाहेर पडल्याचा फोटो व्हायरल!

जगाला समजून घेणे फार डोक्याची गोष्ट आहे. या जगाला समजणे फार सोपे नाही. अगदी, दिवसरात्र अकलेचे तारे तोडलात तरी काही सोय नाही. कारण येथे अनेक गोष्टी अशा घडतात ज्याला काही नेम नाही, तसेच काही तथ्य नाही. आपण तर असे ऐकून असाल कि उंच आकाशात उडनारे (bird)गरुड किंवा घार समुद्राच्या वर येणाऱ्या माशांची शिकार करतात आणि तेच सत्य आहे.

परंतु, अशा काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत, ज्यामध्ये शिकारीचं शिकारीमध्ये मारला जात आहे. हेरॉन या (bird)पक्षाचा उंच उडत असतानाच फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. विशेष बाब म्हणजेया पक्षाला त्याची शिकार फार अवघड पडली आहे. कारण शिकारीचा शिकार जीवावर उलटला आहे. चला तर मग जाणून घेऊयात, काय म्हणतंय हे व्हायरल फोटो?
हे व्हायरल फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. हेरॉन पक्ष्याने शिकार केले आहे. पण या च्यारलं फोटोची विशेष बाब म्हणजे हेरॉन माशाने ज्या माशाचे शिकार केले आहे, त्या माशाने हेरॉन पक्ष्याचे चक्क पोट फाडले आहे. आणि माशा हेरॉन पक्ष्याच्या तावडीतून निसटला आहे. या फोटोंना पाहिलात कि खरंच अनेकांना विश्वास बसणार नाही कि शिकार झालेला माशा, अगदी पोटात जाऊन पक्षाच्या पोटाला चिरून बाहेर येत आहे.
पक्षाच्या तावडीतून सुटत आहे. चक्क, मृत्यूला स्पर्श करून येत आहे. शिकार झालेला पण सुटकेत विजय मिळवणारा हा मासा ईल मासा आहे. फोटोमध्ये हेरॉन आपल्या पायांना मागे करून उडताना दिसून येत आहे. या उंच भरारी दरम्यान, ईल माशाने हेरॉनचे पोटच फाडून टाकले आहे.
A photographer has captured the incredible moment an eel escaped from heron’s stomach while the bird was still in flight. pic.twitter.com/PK5LMVUbF4
— Nature is Amazing (@AMAZlNGNATURE) December 27, 2024
या Viral फोटोंना पाहून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या दृश्यावर प्रश्न उपस्थितीत केले आहेत कि ” माशाने हेरॉनचा पोट फाडलाच कसा?” तर काही नेटकऱ्यांनी हेरॉन पक्षाच्या काळजीत प्रश्न मांडला आहे कि “या प्रकरणानंतर हेरॉन जिंवत आहे कि मृत पावला?” या फोटोला @AMAZlNGNATURE या सोशल मीडिया हॅन्डलने शेअर केला आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे शेअर करण्यात आले आहे. लाखोंच्या घरामध्ये लोकांनी या फोटोला पाहिले आहे तर अनेक हजारो नेटकाऱ्यानी या फोटोला प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा :
नव्या वर्षाचा पहिला आठवडा आणणार धनयोग, 4 राशींचे भाग्य चमकणार
एलॉन मस्क यांनी बदललं स्वत:चं नावं; आता ‘या’ नावाने ओळखले जाणार
Jio, Airtel, VI आणि BSNL युजर्सनी इकडे लक्ष द्या, आजपासून लागू झाले नवीन नियम!