टी-२० वर्ल्डकपसाठी सूर्याचा मास्टरप्लान! स्वत:च केला खुलासा

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा कांऊटडाऊन(master plan) सुरु झाला आहे. आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर वेस्टइंडीज आणि अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात स्थान मिळालेले खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या टी-२० वर्ल्डकपच्या तयारीबाबत भाष्य केलं आहे.

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात(master plan) सूर्यकुमार यादवने १०२ धावांची मॅचविनिंग खेळी केली. या सामन्यानंतर त्याने जियो सिनेमाच्या समालोचकांशी संवाद साधला. त्यावेळी त्याला टी-२० वर्ल्डकपच्या तयारीबाबत प्रश्न विचारण्यात आला.या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला की, ‘ आम्ही जरी आयपीएल खेळत असलो तरी डोक्यात टी-२० वर्ल्डकपच आहे.

त्यासाठी मी देखील सराव करतोय. टी-२० वर्ल्डकपचे सामने अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये होणार आहेत. हे सामने दुपारच्या वेळी होणार आहेत. त्यामुळे मी दुपारच्या वेळी सराव करण्यासाठी मैदानावर जातोय. आतापासून सवय करुन घेतल्याने तिकडे गेल्यानंतर ही गोष्ट नवीन वाटणार नाही.’

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला १ जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना आर्यंलडविरुद्ध होणार आहे. हा सामना ५ जून रोजी होणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार ९ जून रोजी रंगणार आहे. गेल्या १ महिन्यापासून सर्व खेळाडू आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे.

आयपीएलचे सामने संध्याकाळच्या वेळी खेळले जात आहेत आणि वेस्टइंडीजमध्ये होणारे सामने हे दुपारच्या वेळी होणार आहेत. हा एक्स फॅक्टर पाहता सूर्यकुमार यादव दुपारच्या वेळी सराव करण्यासाठी मैदानावर जातोय.

हेही वाचा :

खराब फॉर्ममुळे ड्रेसिंग रूममबाहेर रडला रोहित? Video Viral

वरुण धवनचा संताप, ओरडत थेट म्हणाला, तुला आत यायचंय….,Video Viral

भारताची पहिली वंदे भारत मेट्रो पाहिली का? असा आहे खास लूक