ट्रेनच्या दरवाजात सेल्फी काढणं तरुणाला पडलं महागात, पुढच्याच क्षणी घडलं असं…

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात कधी आपल्याला भावुक करतात तर कधी आपल्याला थक्क करून जातात. सध्या इथे ट्रेन संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक तरुण सेल्फी(selfie) काढताना दिसून येत आहे. मात्र पुढच्याच क्षणी तरुणाला ही सेल्फी चांगलीच महागात पडते आणि त्याचे मोठे नुकसान होते. नक्की काय घडते ते सविस्तर जाणून घेऊया.

ट्रेनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात कधी कोणी रील बनवताना तर कधी कोणी ट्रेनमध्ये चढण्यासाठी धडपडताना दिसत असत. पण नुकताच समोर आलेल्या व्हिडिओने सर्वांनाच धक्का दिला आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलाचा निष्काळजीपणा दिसून येतो.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा ट्रेनच्या दारात उभा असताना सेल्फी काढण्यात व्यस्त होता. ट्रेन फुल स्पीडने धावत होती, पण तरीही मुलगा सेल्फीकडे(selfie) लक्ष देत होता. हे दृष्य थोडंसं धोकादायक वळण घेत कारण इतक्या वेगाने ट्रेनच्या दारात कोणीतरी उभं राहणं अत्यंत जोखमीचं असू शकतं, पण तो मुलगा त्याच्या आनंदात इतका हरवून गेला होता की त्याला कुठलाही धोका जाणवला नाही.
पुढे तुम्हाला दिसेल की तो मुलगा सेल्फी घेण्यात मग्न असतानाच अचानक त्याच्या हातातून मोबाईल सटकतो आणि खाली पडतो. मोबाईल पडताना पाहून मुलाच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चातापाचे भाव उमटते. यानंतर तो लगेच कपाळाला हात लावतो. सेल्फीच्या नादात तो आपला फोन गमावतो आणि पश्चाताप करत बसतो. आपला निष्काळजीपणा कसा आपल्या अंगलड येऊ शकतो हे या व्हिडिओतून स्पष्ट होते.
हा व्हायरल व्हिडिओ @sarvjeet7444 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ट्रेन वायरल वीडियो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अजून सेल्फी काढ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नीट पहा तो मोबाईल नाही मोबाईलचा कव्हर आहे”.
हेही वाचा :
प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाला अणखी एक मोठा धक्का
मुलं रात्री 2 वाजता उठतात आणि आई-वडिलांना…कपिल शर्माचं ‘ते’ विधान चर्चेत!
मनोज जरांगे पाटलांच्या दोन मागण्या झाल्या मान्य; काय असणार पुढची रणनीती?