घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलच्या नव्या प्रेमाची चर्चा? दुबईत ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत दिसला!

भारतीय क्रिकेटपटू(Cricketer) युजवेंद्र चहल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबईमध्ये खेळल्या जात असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात तो एका अनोळखी सुंदर तरुणीसोबत दिसल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत असून, “चहलच्या आयुष्यात ही नवीन व्यक्ती कोण?” असा प्रश्न अनेक नेटकरी विचारत आहेत.

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकीने प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकणारा चहल(Cricketer) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला. त्यांच्या नात्यातील दुरावा अनेक दिवसांपासून चर्चेत होता आणि अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर चहल वैयक्तिक जीवनात पुढे जात असल्याची चर्चा सुरू असतानाच, त्याच्या नवीन मैत्रिणीची ओळख चर्चेचा विषय बनली आहे.
दरम्यान, चहल सामना पाहण्यासाठी स्टँडमध्ये बसला असताना त्याच्यासोबत एक सुंदर मुलगी दिसली. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि चाहत्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला. ती मुलगी त्याची प्रेयसी आहे की फक्त एक चांगली मैत्रीण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही चाहत्यांनी त्याला थेट विचारलं की “धनश्रीसोबत घटस्फोटानंतर चहल पुन्हा प्रेमात पडला आहे का?”
युजवेंद्र चहलसोबत दिसलेली ही मुलगी आरजे महवाश आहे. ती एक प्रसिद्ध युट्यूबर आणि रेडिओ जॉकी असून, क्रिकेट आणि अन्य क्षेत्रांमध्ये तिचे मोठे नेटवर्क आहे. विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा आरजे महवाश चहलसोबत दिसली आहे. याआधीही त्यांचे फोटो व्हायरल झाले होते आणि तेव्हा देखील दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यावेळी महवाशने या अफवांना फेटाळून लावले होते.
मात्र आता सोशल मीडियावर चहलच्या या नवीन फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्याला पुन्हा प्रेमात पडल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी ही केवळ मैत्री असल्याचा अंदाज वर्तवला आहे. महवाश आणि चहल यांच्या नात्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र या चर्चेमुळे क्रिकेटविश्वात उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा :
मिठी मारली अन्… शाहीद-करीना 18 वर्षांनी भेटले; चाहते म्हणतात, ‘सर्वात खास क्षण’
पाण्याची टाकी साफ करताना ५ सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू
गुड न्यूज! लालपरीचं LIVE लोकेशन कळणार थेट मोबाइलवर
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली