तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचा ब्रेकअप?

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, (news)अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर, या जोडप्याने आपलं नातं संपवलं आहे. ब्रेकअपच्या बातमीनंतर तमन्ना आणि विजयने त्यांच्या इंस्टाग्रामवरून त्यांचे एकत्र फोटो देखील डिलीट केले आहेत.पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, तमन्ना आणि विजय काही आठवड्यांपूर्वी वेगळे झाले होते. ब्रेकअपवर ते सध्या मौन बाळगत आहेत. तमन्ना आणि विजयच्या लग्नाची वाट पाहत असल्याने दोघांचेही चाहते ही बातमी ऐकून खूप नाराज झाले आहेत. जिथे जिथे ते दोघे एकत्र दिसायचे तिथे सगळे त्यांना त्यांच्या लग्नाबदद्ल विचारायचे.

डिलिट केले फोटो
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा या दोघांचेही आता इंस्टाग्रामवर एकत्र फोटो नसून ते डिलिट केले आहेत. एवढंच नव्हे तर फोटो डिलीट झाल्यापासून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांना वेग आला आहे. वृत्तानुसार, विजय आणि तमन्ना यांचे काही आठवड्यांपूर्वी ब्रेकअप झाले होते परंतु दोघांनी कायमचे चांगले मित्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. तमन्ना आणि विजय दोघेही सध्या आपल्या कामावर लक्षकेंद्रित करताना दिसत आहे.
‘लस्ट स्टोरीज २’ च्या प्रमोशन दरम्यान तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी त्यांचे नाते सगळ्यांसमोर मान्य केले होते. विजय एकदा म्हणाला होता की, ते त्यांचे नाते लपवत नाहीत पण तरीही, (news)तो त्याच्या नात्याला गोपनीय ठेवण्याला महत्त्व देतो आणि हजारो फोटो फक्त स्वतःसाठी ठेवतो. त्यांनी असेही म्हटले की, नातं लपवण्यासाठी अनावश्यक प्रयत्न करावे लागतात, जसे की सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे किंवा मित्रांना फोटो क्लिक न करु देणेय
विजय आणि तमन्ना यांनी अनेकदा एकत्र फोटो शेअर केले आहेत. (news)एवढंच नव्हे तर ते मोकळेपणाने पोझ देतात. जेव्हा ते दोघे एकत्र दिसायचे तेव्हा ते नक्कीच पापाराझींसाठी पोझ देत असत. एवढेच नाही तर ते एकत्र कार्यक्रमांनाही उपस्थित राहत असत.विजय वर्मा शेवटचे ‘आयसी 814: द कंधार हायजॅक’ मध्ये दिसले होते. याशिवाय तो इतर काही प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर तमन्ना भाटिया काही चित्रपटांमध्येही दिसणार आहे. तो शेवटचा ‘स्त्री २’ मध्ये दिसला होता. तथापि, त्यांच्या ब्रेकअपची बातमी किती खरी आहे हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
हेही वाचा :
सेमी फायनलवेळी पाऊस पडला तर हा संघ थेट फायनलमध्ये पोहचणार
कराड गँगच्या अमानवीय क्रूरतेचा आणखी एक मोठा पुरावा समोर!
बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी थक करणारी….