टीम इंडिया-अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द का? जाणून घ्या

रुवात होणार आहे. सुपर 8 मधील 8 संघांना 4-4 नुसार ए आणि बी ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. टीम इंडियासोबत ए ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया आहे. तर बी ग्रुपमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि यूएसए आहे. टीम इंडिया सुपर 8 मधील आपल्या मोहिमेला 20 जूनपासून सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. सामना ब्रिजटाउन केनसिंगटन ओव्हल येथे होणार आहे. हवामान खात्यानुसार, येथे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तसेच साखळी फेरीतील बरेच सामने हे पावसामुळे वाया गेल्याने अनेक संघांचं सुपर 8 मधील समीकरणं गडबडलंय. अशात आता सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाल्यास निकाल कसा लागणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत जाणून घेऊयात.

टीम इंडिया-अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द झाल्यास निश्चितच दोन्ही संघांसाठी तो मोठा फटका असणार आहे. तसेच सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. याचा फटका हा दोन्ही संघांना पुढील फेरीसाठी नुकसानकारक ठरु शकतो. त्यामुळे सुपर 8 मध्ये पाऊस होउच नये, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. मात्र पावसाने खेळ बिघडवलाच, तर 1-1 गुण घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान सुधारित संघ: रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई.

हेही वाचा :

माझ्या मुलीला मारलं… आता त्याचाही जीव पाहीजे, तरुणीच्या हत्येनंतर आईची संतप्त प्रतिक्रिया

आनंदवार्ता, सोने-चांदीत स्वस्ताई, इतके उतरले भाव

 ‘तू भारतीय असशील…’; पाक गोलंदाज हॅरिस रॉफकडून चाहत्याला धक्काबुक्की!