टीम इंडियाने केएल राहुलसह ‘या’ 3 खेळाडूंना वगळले

भारत आणि न्यूझीलंड संघ(Team India) 3 कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. बंगळुरूमध्ये भारताचा पराभव करत न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करणाऱ्या टीम इंडियाला थोडा मोठा धक्का बसला आहे, ज्याला येथे जिंकून पुन्हा ट्रॅकवर यायचे आहे. बंगळुरूमध्ये पावसाने संकट ओढवले होते पण पुण्यातील हवामान पाहिल्यास येथे पावसाची शक्यता नाही. हवामान स्वच्छ असेल आणि सामन्यावर हवामानाचा कोणताही परिणाम होणार नाही.

या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक संपल्यानंतर दोन्ही संघांनी(Team India) आपापल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये 3 मोठ्या बदलांची माहिती दिली, ज्यापैकी एक अपेक्षेप्रमाणे केएल राहुलशी संबंधित होता.

नाणेफेक हारल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, मलाही प्रथम फलंदाजी करायची होती. यानंतर त्याने संघाबद्दल बोलताना सांगितले की, ” पुणे कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल आहेत. रोहित शर्माने सांगितले की, केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव पुणे कसोटीत सहभागी होणार नाहीत. या तिघांच्या जागी शुभमन गिल, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे.”

कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप.

हेही वाचा :

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी प्रगती; दुसऱ्या राज्यातून आरोपी अटकेत

दुसऱ्या कसोटीपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मोठा धक्का

पाण्यात पडलेल्या मालकाला वाचवण्यासाठी श्वानाने घेतली धाडसी उडी; व्हिडिओ पाहून तुम्ही होणार अवाक!