यूएसए विरुद्ध टीम इंडियाने टॉस जिंकला, बॅटिंग कुणाची?
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 25 व्या सामन्यात ए ग्रुपमधील यजमान संघ यूएसए विरुद्ध टीम इंडिया (cricket)आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. दोन्ही संघांनी याआधीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आता यूएसए आणि टीम इंडिया दोघांना हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये पोहचण्याची संधी आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर मोनांक पटेल याच्याकडे गुजरातची सूत्रं आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस पार पडला. टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा निर्णय घेत यूएसएला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
युनायटेड स्टेट टीम : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, कोरी अँडरसन, नितीश कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार, नॉथुश केंजिगे, निसर्ग पटेल आणि शायन जहांगीर.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
हेही वाचा :
आज विधानसभा निवडणुका झाल्यास मराठवाड्यात कुणाला किती जागा?
डस्टबिन घराच्या या दिशेला अजिबात ठेवू नये , कुटुंबातील व्यक्तींवर वाढतो कर्जाचा बोजा
कोल्हापूर:फुटबॉल पंढरी’त 25 एकरांत साकारणार आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदान