गोविंदाला महापालिकेतील भ्रष्टाचार सांगा; ठाकरे गटाची मागणी
भ्रष्टाचार करून, शिवसेनेची गद्दारी करून ठाणे शहराची वाट लावणाऱ्या शिंदे गटाला या निवडणुकीत गोविंदा, गोविंदा करावे लागत आहे (future). अभिनेता गोविंदाला महापालिकेतील भ्रष्टाचार सांगा, त्यांना मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ दाखवा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाढवे यांनी केली आहे.
ठाण्यात शिंदे गटाला विकास सांगण्याचे मुद्देच नसल्याने त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विकास दाखवण्यासारखं नसल्याने सिने अभिनेते गोविंदा यांना प्रचारासाठी बोलवावे लागत आहेत. गोविंदाला फक्त घोडबंदर वस्तीत फिरविण्यात आले. त्याला वागळे इस्टेट, राम नगर, लोकमान्य नगर, किसन नगर, रुपादेवी पाड्यात घेऊन गेले असते तर बरं झाले असते अशी टीका गाढवे यांनी केली.
गोविंदाची पण मस्करीच केली…
खरं तर लोकसभा ही महत्त्वाची निवडणूक समजली जाते. या निवडणूकीत राष्ट्रहिताचे, देशहिताचे आणि भविष्याची (future) पिढी घडविण्याबरोबर शहरात कोणते मोठे प्रकल्प राबविता येतील याचे खात्री आणि आश्वासन देणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत अभिनेते, कलाकार यांना मिरवून फक्त मनोरंजन न करता ठाणेकरांचे महत्वाचे प्रश्न समजून घेतले तर त्याला अर्थ असल्याचे गाढवे यांनी यावेळी सांगितले.निवडणुकीच्या प्रचारात गोविंदाला आणून शिंदे गटाने मस्करीच केली असल्याची खोचक टीका गाढवे यांनी केली. तसेच ठाणे महापालिकेतील शिंदे गटाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपने उचललेला मुद्दे, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ गोविंदाला दाखवा अशी मागणी गाढवे यांनी केली.
हेही वाचा :
शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची लवकरच होणार नियुक्ती
भाजपला बहुमताचा आकडा गाठणं कठीण…; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार?