महाराष्ट्रातील तापमानात होणार घट; तुरळक पावसाचा अंदाज!

बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार(influence) असून, याच्या प्रभावामुळे राज्यात पुढील आठवडय़ात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने IMD वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, पुढील काही दिवस तो कायम राहण्याचा अंदाज आहे.

दक्षिण अंदमानच्या समुद्रात  सध्या हवेची द्रोणीय स्थिती असून, २३ नोव्हेंबरपर्यंत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार आहे. त्यानंतर पुढे या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. हे क्षेत्र पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे प्रवास करणार असून, यामुळे तामिळनाडू, केरळ, पाँडेचरी, आंध्र प्रदेशच्या भागात जोरदार पाऊस होणार आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात बाष्पयुक्त हवा वाहणार असून, खासकरुन दक्षिण महाराष्ट्राच्या भागात ढगाळ वातावरण, तुरळक (influence)पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे थंडीचा कडाका कमी होणार असून, किमान तापमान वाढणार असल्याचे हवामान विभागाने IMD म्हटले आहे.

कोल्हापूर-दक्षिण कोकणात पाऊस

गेल्या आठवडय़ात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात पाऊस झाला होता. आताही तशीच स्थिती निर्माण झाली असून, २६ नोव्हेंबरनंतर (influence)कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्गच्या भागात पावसाचा अंदाज आहे.

हुडहुडी कायम

राज्यात थंडीने हुडहुडी भरविली असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ात याचा कडाका जास्त आहे. पुढील पाच दिवस थंडी कायम असेल, त्यानंतर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याने कडाका कमी होईल.

हेही वाचा :

मोठी बातमी! शाळेतील वादातून वर्गात विद्यार्थ्याचा गळा चिरला

दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी होणार परिक्षा!

कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यास धक्काबुक्की; हजारो कार्यकर्ते आमने-सामने

मोठी बातमी! शाळेतील वादातून वर्गात विद्यार्थ्याचा गळा चिरला

विश्वचषक गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूवर जर्मनीत सर्जरी