टीम इंडियाचं टेन्शन वाढलं गिल अस्वस्थ, रोहित दुखापतीमुळे होऊ शकतो बाहेर

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला (entered)आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध रंगणार आहे. भारतासह न्यूझीलंडनेही सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.हा सामना केवळ नंबर १ वर जाण्यासाठी खेळला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. तो हॅम्स्ट्रींगच्या दुखण्याने त्रस्त आहे. २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात तो दुखापतीमुळे काही मिनिटं मैदानाबाहेर गेला होता. मात्र अजूनही रोहित शर्मा पूर्णपणे फिट झालेला नाही.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा भारतीय संघाचा फलंदाजीचा सराव सुरु असताना केवळ दर्शक म्हणून बाहेर बसला होता. त्याने सरावात सहभाग घेतला नव्हता. त्याची दुखापत आणखी वाढू नये म्हणून त्याने सरावात सहभाग घेतला नव्हता. रोहितसह गिलनेही सराव सत्रात सहभाग घेतला नव्हता. माध्यमातील (entered)वृत्तानुसार, गिल देखील अस्वस्थ आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंतला ताप आला होता. मात्र आता तो पूर्णपणे ठीक झाला आहे. याच सामन्यात मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर गेला होता. मात्र आता सरावात तो पूर्ण जोशमध्ये गोलंदाजी करताना दिसून आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३ षटक गोलंदाजी केल्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्याने पुन्हा मैदानात येऊन गोलंदाजी केली होती.

भारतीय संघाने साखळी फेरीतील सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तान (entered) या दोन्ही संघांना पराभूत केलंय. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता. तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता. आता न्यूझीलंडला पराभूत करुन भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ अव्वल स्थानी पोहचेल.

हेही वाचा :

धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार..

हार्दिकच्या गर्लफ्रेंडने सगळ्यांसमोर केलं असं काही, पाहा व्हायरल व्हिडीओ!

काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?