कोल्हापूरच्या शिरोलीत भीषण अपघात बाराचाकी ट्रक पुलावरून कोसळला
कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी येथील मयूर फाट्याच्या उड्डाणपुलावर एक विचित्र अपघात (truck)झाला. हा अपघात गुरुवारी दि.5 सकाळी अकराच्या सुमारास पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झाला. सध्या राष्ट्रीय महामार्ग क्र 4 चे काम सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे काम चालू असल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. त्यात गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ऊसाची ट्रॉली कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. तेव्हा अपघात झाला.ऊसाच्या ट्रॉलीने ब्रेक मारल्यानंतर त्यापाठोपाठ असणाऱ्या कारने एमएच १४ डीए ९७२० या आपल्या गाडीचा वेग कमी केला.
पण त्यामागे असणाऱ्या केए २२ एए २३१८ या ट्रकला अंदाज न आल्याने कारला धडक दिली. त्यामुळे कार जागेवर फिरली. तेवढ्यात मागून बाराचाकी ट्रक टीएन ८८ एए ३४७९ या क्रमांकाचा आला. अचानक समोरील वाहने थांबल्याने त्याला गाडी नियंत्रित करता आली. त्यामुळे त्या ट्रकने समोरच्या वाहनांना चुकविण्याच्या नादात ट्रक डाव्या बाजूला घेतल्याने ट्रक थेट उड्डाणपुलावरून सेवा रस्त्यावर कोसळला. या (truck)अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शिरोली एमआयडीसीमुळे हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो. ज्यावेळी ट्रक महामार्गावरील उड्डाणपुलावरून सेवा रस्त्यावर कोसळला. त्यावेळी सुदैवाने कोणतेही वाहन खाली सेवा रस्त्यावर नव्हते. तसेच महामार्गाचे काम चालू असलेले तेथे काम करणारे कामगार सुद्धा नव्हते. नाहीतर याठिकाणी मोठा अनर्थ झाला असता. ही घटना प्रत्यक्ष बघणाऱ्यांनी हा थरकाप सांगितल्यावर जमलेल्या नागरिकांच्या अंगावर शहारे येत होते.ही घटना घडल्यानंतर तेथे हजर असणारे नागावचे सामाजिक कार्यकर्ते जीवनधर पाटील, वैभव कुंभार,(truck) सुकुमार कांबळे, कुलभूषण कोळी यांनी तातडीने जखमींना वाहनातून बाहेर काढले. तसेच तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना पुढील उपचारासाठी पाठवले. घटना घडल्यानंतर सुमारे तासभर कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
या अपघाची माहिती समजताच शिरोली एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. तात्काळ वाहतुक सुरळीत केली. या अपघातात बाराचाकी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वॅगन आर व दुसऱ्या ट्रकचे मोठे नुकसान झाले. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा :
शिवसेनासह राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेतही एकनाथ शिंदेंचं नाव नाही!
‘माझ्या मुलाला सोडा’; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये
इतिहासाची अशीही पुनरावृत्ती! तेव्हा ठाकरे, आता शिंदे; पक्षप्रमुखांसमोर पेच, कारण तेच
‘मी धोनीशी बोलत नाही, 10 वर्ष झाली…’ हरभजन सिंहचं MS Dhoni बाबत खळबळजनक वक्तव्य