समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव बस ट्रकला धडकली, एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-560-1024x576.png)
धामणगाव रेल्वे : आष्टा गावातील चॅनल क्रमांक 10 जवळ ओव्हरटेकच्या नादात भरधाव ट्रॅव्हल्सने ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात(accident) एकाचा मृत्यू झाला तर 10 प्रवासी जखमी झाले. बुधवारी (दि.15) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. संतोष राम परिहार (42, रा. येरवडा, पुणे) असे मृत ट्रॅव्हल्सचालकाचे नाव आहे. यामध्ये 10 प्रवासी जखमी झाले आहेत.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-542-1024x1024.png)
जखमींमध्ये गणेश भरत गोळे (19, रा. बाणेर), आर. एन. नीलेश बधगणे (23, रा. शिक्षकनगर, कोथरूड, पुणे), संतोष नामदेव शेलार (40, रा. अहमदनगर), दीपक पोपट शिंदे (31 रा. पुणे), योगेश राजकुमार ठगाणी (26 रा. दयालनगर, वर्धा), विनय अशोक मुकेवार (26, रा. ठक्कर कॉलनी, नवीना पार्क, चंद्रपूर), अनिता सतीश नायक (61 रा. लोधीपुरा, नागपूर), सुरेंद्र साहेबराव शिरसाठ (56, रा. वानाडोंगरी, हिंगणा रोड), सोनूकुमार साहू (23 रा. प्रयागराज), शाबा शेख मोहम्मद याहया शेख (30 रा. घाटकोपर, चिरागनगर, मुंबई) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
या घटनेच्या माहितीवरून मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमींना धामणगाव व पुलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. काही जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गालगत असलेल्या आष्टा गावातील चॅनल क्रमांक 90 जवळ हा अपघात झाला. ट्रॅव्हल्स चालकाने (एमपी-45/ झेडएफ-8849) ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकला (एमएच 04/ जीएल- 0517) मागून धडक दिली. यात ट्रॅव्हल्स चालक संतोषचा जागीच मृत्यू झाला. तर 10 प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यांना धामणगाव रेल्वे व यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पहाटे झालेल्या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती. समृध्दी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार गौतम इंगळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. पहाटेची वेळ असल्याने ट्रॅव्हल्सचालकाला झोपेची डुलकी लागली अथवा ओव्हरटेक करण्याचा नादात हा अपघात(accident) झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे.
अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केली होती. काही प्रवाशांना काचा फोडून बसच्या बाहेर काढण्यात आले. दरम्यान, किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. तर काही प्रवाशांना पुलगाव येथे दाखल करण्यात आले आहे. या ट्रॅव्हल्समध्ये 27 प्रवासी प्रवास करत होते.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात भीतीचं वातावरण
राज्याचा अर्थसंकल्प 3 मार्चपासून होणार सुरु; लाडक्या बहिणींना मिळणार मोठी खूशखबर
अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला! जेष्ठ नेते शरद पवारांनी केली सरकारकडे ‘ही’ मागणी