‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीकरणाचा(politics) निर्णयावरून चांगलच रान तापलं होतं. पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत या हिंदी सक्तीला टोकाचा विरोध केला. मनसे आणि ठाकरे गटाच्या आक्रमकतेपुढे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. हिंदी सक्तीविरोधात येत्या ५ जुलैला मनसे आणि ठाकरे गटाची विजयी सभा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी निमंत्रण पत्रिकाच प्रसिद्ध केली आहे.

येत्या पाच जुलैला वरळी डोममध्ये तब्बल १९ वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधु एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मराठीचा आवाज या घोषणेसह खासदार संजय राऊत यांनी या सभेची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे येत्या पाच तारखेची सभा ऐतिहासिक सभा असणार आहे. पण त्याचवेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मनसेचं अस्तित्त्व धोक्यात येईल, असा दावा शिंदे गटाने केला आहे. तर भाजपने मात्र राज आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्य सरकारच्या(politics) हिंदी सक्तीला तीव्र विरोध दर्शवत दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याची भूमिका घेतली. त्यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. त्यानंतर ठाकरे बंधुंनी विजयी सभा घेणार असल्याचे घोषित केली. पण या सभेनंतरही आगामी महापालिका निवडणुकीत ही वज्रमुठ कायम राहणार की दोघांच्या वाटा वेगळ्या होणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही शिवसेनेच्या मूळ वारशातून तयार झालेले नेते. गेल्या काही वर्षांपासू राज आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, आणि मुंबईसह राज्यभरात आपली सत्ता स्थापन करावी, अशी मागणी होताना दिसत आहे. येत्या पाच जुलैला होणाऱ्या सभेकडे त्यांच्या चाहते अपेक्षेने पाहत आहे. खरंतर, गेल्या दोन दशकांपासून दोघांची राजकीय वाटचाल वेगवेगळी झाली असली, तरी सध्या हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून ते पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. या संभाव्य युतीमुळे दोघांच्याही पक्षांना काही विशिष्ट राजकीय फायदे होण्याची शक्यता आहे.

१. मराठी मतदारांचे एकत्रीकरण
मराठी अस्मितेचा मुद्दा हा दोघांच्याही राजकारणाचा(politics) केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्यामुळे जर राज आणि उद्धव एकत्र आले, तर मराठी मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव अधिक मजबूत होऊ शकतो.

२. मनसेला नवसंजीवनी
गेल्या काही वर्षांपासून मनसेच्या राजकीय ताकदीत घट झाली आहे. शिवसेनेसोबत युती झाल्यास मनसेला पुन्हा नवसंजीवनी मिळू शकते, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये चांगली संधी उपलब्ध होऊ शकते.

३. शिवसेनेची मुंबई-पुण्यात पकड मजबूत
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरी भागांमध्ये आधीपासूनच आधार आहे. राज ठाकरे यांची शैली आणि भाषणकौशल्य यामुळे तरुणांमध्ये आकर्षण आहे. हे दोघं एकत्र आल्यास महानगरांमध्ये शिवसेनेची पकड आणखी बळकट होऊ शकते.

४. भाजप-शिंदे गटासाठी आव्हान
या युतीमुळे भाजप आणि शिंदे गटाला महानगरपालिका निवडणुकांमध्ये थेट आव्हान उभं राहू शकतं. विशेषतः मुंबई महापालिकेसाठी ही युती निर्णायक ठरू शकते.

हेही वाचा :