‘लाडक्या कंत्राटदारांनी अर्थसंकल्प गिळला’; अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका

विधानसभा(political news) निवडणूक काळात वारेमाप जाहिराती दिल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि सामान्य जनतेची घोर निराशा झाली आहे. सरकारने जाहीर केलेला हा अर्थसंकल्प हा अंत्यत बोगस आहे.

अर्थसंकल्पातून(political news) राज्यातील जनतेच्या हाती काहीच लागले नाही. केवळ थापा मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. राज्य सरकारकडून केवळ महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालंय. लाडक्या कंत्राटदारांनी हा अर्थसंकल्प गिळला आहे, अशा शेलक्या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

पाच वर्षांत जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या नाहीत. तर शेतकऱ्यांच्या विजेच्या थकबाकीचे काय करणार ? हे स्पष्ट केले नाही तर शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेबाबत घोषणा केली नाही. मुंबईसाठी 64 हजार कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे सर्वसामान्यासाठी नाहीत तर केवळ हे सर्व कामे गुत्तेदारासाठी (कॉन्ट्रॅक्टर) आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे केली.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याऐवजी 24 तास वीज द्यावी, अशी मागणी आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकीकडे मेट्रोवर खर्च केला जातोय, मग बेस्टवर का केला जात नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित करीत महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी यांनी केली आहे का? शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही. प्रत्येकाला अन्न आणि निवारा कधी देणार? तुमचं सरकार स्थिर असताना जीवनावश्यक वस्तू स्थिर कधी ठेवणा? आजच्या अर्थसंकल्पामध्ये काय आहे? सामान्य माणसासाठी, काही नाही पण कॉन्ट्रॅक्टरसाठी खूप काही आहे. लाडक्या बहिणींसाठी नाही तर कंत्राटदारांवर जास्त लक्ष आहे, म्हणून हा अर्थसंकल्प कंत्राटदारांनी गिळला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

दोन विमानतळ जोडण्याचे कामही सरकार करणार म्हटले आहेत. पण हे अदानीचं काम आहे. तुम्ही तुमच्या मालकाची काम करणार आहात का? शेतकऱ्यांना मोफत विजेची घोषणा केली. पण आता शेतकऱ्यांना बिल यायला लागली त्याच तुम्ही काय करणार आहात? थापानामा किंवा झोलानामा म्हणा. त्यांनी 2024 निवडणुकीत बोलले होते, त्यातील एक गोष्ट तरी आज केलीय का? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला. अत्यंत बोगस अर्थसंकल्प आहे. असा अर्थसंकल्प गेल्या दहा वर्षात पाहिला नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :

चॅम्पियन झाल्यावर बायकोसमोरच रोहितला अनुष्काने मारली घट्ट मिठी Video Viral

अर्थसंकल्पादरम्यान लाडक्या बहीणींसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

IPL 2025 सुरू होण्याआधीच बहुचर्चित खेळाडूची माघार; दोन वर्षांच्या बंदीची कारवाई होणार?