‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये पसरलेल्या बर्ड फ्लूच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवसांत १,२३७ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. यामुळे बाधित झालेल्या ४३ शेतकऱ्यांना(farmers) नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी दिली.
बर्ड फ्लूच्या साथीमुळे तीन शेतकऱ्यांच्या(farmers) १२० कोंबड्या दगावल्या होत्या. केंद्रीय आरोग्य विभागाच्या तपासणीत या कोंबड्या बर्ड फ्लूमुळेच दगावल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. खबरदारीचा उपाय म्हणून ९ फेब्रुवारीपर्यंत बाधित क्षेत्र सील करण्यात आले होते.
या मोहिमेदरम्यान बाधित क्षेत्रातील १,२३७ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. यामुळे बाधित झालेल्या ४३ शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे बर्ड फ्लूची साथ आटोक्यात आली आहे. या मोहिमेमुळे मोठी हानी टळली असून, नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पशुसंवर्धन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
चिमट्याने केस स्ट्रेट करण्याचा जुगाड तरुणीला पडला महागात; केसांना आग लागली अन्…
मन सुन्न करणारी घटना, शेतात काम करताना लेकीचा ओरडण्याचा आवाज आला अन्…
रोहितचे चाहत्यांशी सेल्फीमधून स्नेह; कोहलीच्या नकाराचा चर्चेत ठसा