या राशींच्या कुंडलीत येणार अच्छे दिन या तारखेपासून व्हाल मुक्त 

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेव न्याय व कर्म देवता म्हणून (movement)ओळखले जातात. शनीची चाल बदलताच सर्व १२ राशींवर त्याचा शुभ-अशुभ प्रभाव होतो. प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा हिशोब शनी महाराज ठेवत असतात व त्यानुसार चांगल्या कर्मास चांगले व वाईटास वाईट असे फळ मिळते. शनिवार हा शनीचा वार मानला जातो, त्यामुळे शनीच्या पूजेसाठी सुद्धा शनिवारचे विशेष महत्त्व आहे.

१७ जानेवारी २०२३ रोजी शनीने गोचर करून तब्बल ३० वर्षांनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश केला होता. २०२५ पर्यंत शनी कुंभेतच स्थित असणार आहेत. ग्रह बदल झाला नसला तरी मागील दीड वर्षात शनीने अनेकदा नक्षत्र परिवर्तन केले आहे. मार्गी-वक्री, उदय-अस्त होताना शनीचा प्रभाव अनेक राशींवर पडत आहे.२९ जूनला शनीदेव वक्री झाले होते आणि पुढील चार महिन्यांनी म्हणजेच १५ नोव्हेंबरला शनी महाराज मार्गी होणार आहेत. शनी मार्गी होताच काही राशींवरील साडेसातीचा प्रभाव कमी होणार आहे.

शनी महाराज २९ जूनला वक्री झाले होते व आता ते वक्र चाल करत कुंभ राशीत भ्रमण करत आहेत. शनी चार महिन्यांनी म्हणजेच १५ नोव्हेंबरला पुन्हा मार्गी होणार आहेत. २९ मार्च २०२५ पर्यंत शनी कुंभेतच स्थित असणार आहे. त्यामुळे शनी मार्गी झाल्यावर सुद्धा त्यांचे मूळ वास्तव्याचे (movement)स्थान हे कुंभच असणार आहे. १५ नोव्हेंबरला संध्याकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी शनी मार्गी होणार आहेत. या कालावधीत काही राशींना महत्त्वपूर्ण फायदे होणार आहेत.

सध्या मकर राशीवर शनीच्या साडेसातीचा सर्वाधिक प्रभाव आहे. मीन राशीचा सुद्धा शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे, तर कुंभ राशीत साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. शनी नोव्हेंबरमध्ये मार्गी झाल्यापासूनच मकर राशीच्या मंडळींवरील शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होऊ लागेल व शनीने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीची साडेसाती संपुष्टात येईल. यानंतर मेष राशीत साडेसातीचा प्रभाव सुरु होईल.

शनीदेवांच्या चाल बदलामुळे अनेक (movement)राशींवरील साडेसातीचा प्रभाव कमी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या प्रभावामुळे राशींच्या जीवनात बदल घडून येतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाय करणे आणि शनीच्या पूजेसाठी शनिवारचा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

हेही वाचा :

रेल्वे फाटक ओलांडताना अडकली कार .भरधाव ट्रेन अन् १६ सेकंदांत…video

पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली घरी परतताना महिलेवर अत्याचार

आता झोमॅटो, स्विगीवरून खाद्यपदार्थ मागवणं महागणार, चार्जेसमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी वाढ!