पोटचा गोळाच बनला हैवाण; आईसोबत मुलाचं अत्यंत भयंकर कृत्य

 बिहारमधीलनालंदा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली (kaliyuga)आहे. येथे एका कलियुगी मुलाने आपल्या आईची निर्घृण हत्या केली. आरोपीने आपल्या ७५ वर्षीय आईचे शीर धडावेगळे केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्रही जप्त केले आहे.ही घटना नालंदा जिल्ह्यातील राजगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सबलपूर गावात घडली. एका माथेफिरू मुलाने धारदार शस्त्राने आपल्या आईचे शीर धडावेगळे केले. शनिवारी सकाळी मृत महिलेच्या घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला

त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांना वृद्ध महिलेचे शीर धडावेगळे पडलेले दिसले.त्यानंतर शेजाऱ्यांनी राजगीर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी(kaliyuga)पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, लोक या क्रूर हत्याकांडाने स्तब्द्ध झाले आहेत.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला अटक केली. राजगीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजीव कुमार सिंह यांनी सांगितले की, आरोपी मुलगा व्यसनी असून तो(kaliyuga) नेहमी आईकडे पैशांची मागणी करत असे. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने धारदार शस्त्राने तिची हत्या केली. घटनेची माहिती शनिवारी सकाळी शेजाऱ्यांनी दिली.आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने शुक्रवारी रात्री हे कृत्य केले. हत्येनंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याला पकडले. 

हेही वाचा :

ICC ची मोठी घोषणा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्याला मिळणार कोटींचे बक्षीस उपविजेत्यांसाठीही मोठी रक्कम

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी!

हंपबॅक व्हेलने जिवंत माणसाला गिळले पण पुढच्याच क्षणी जे घडलं… Video Viral