श्रीलंका मालिकेच्या आधी बोर्डाचा मोठा निर्णय, ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं संघाचं नेतृत्व
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 27 जुलैला श्रीलंकेच्या(leadership) पल्लेकेले मैदानावर हा सामना रंगणार आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघ तीन टी20 सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. टी20 मालिकेतील तीनही सामने पल्लेकेले मैदानावर खेळवले जाणार आहेत. तर त्यानंतर 2 ऑगस्टपासून भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. टी20 मालिकेपासून गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळाला सुरुवात करणार आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्र क्रिकेट(leadership) बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. मराठमोठा खेळाडू ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्र क्रिकेट संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. 27 वर्षांच्या ऋतुराज गायकवाडला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियात संधी देण्यात आली होती, पण श्रीलंका दौऱ्यात त्याची निवड करण्यात आली नाही. आता त्याच्यावर महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. रणजी ट्रॉफी 2024-25 साठी महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी ऋतुराजची निवड करण्यात आली आहे. रणजी ट्रॉफीत महाराष्ट्राचा पहिला सामना जम्मू-काश्मिरबरोबर आहे.
रणजी ट्ऱॉफीच्या गेल्या हंगामात केदार जाधवने महाराष्ट्र क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं होतं, पण जून महिन्यात त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या आठवड्यात ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे रणजीचा पूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता, पण या हंगामात तो पूर्णपणे सज्ज झालाय.
झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाने पाच टी20 सामने खेळले, ज्यात ऋतुराज गायकवाडने दमदार कामगिरी केली होती. तरीही, ऋतुराजला श्रीलंका दौऱ्यातील टी20 संघात जागा देण्यात आली नाही, यावरून सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोलही करण्यात आलं होतं.
ऋतुराज गायकवाडने 2021 मध्ये टीम इंडियासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत तो भारतासाठी 23 टी20 सामने खेळला असून, यात त्याने 143.54 च्या स्ट्राईक रेटने 633 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
ऋतुराजने एशियन्स गेम्समध्येही भारताचं नेतृत्व केलं होतं आणि त्याच्या नेतृत्वात भारताने सुवर्ण पदक पटाकवलं. 2024 च्या आयपीएल हंगामात एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोडल्यानंतर ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेची धुरा देण्यात आली होती. सीएसकेला प्लेऑफमध्ये पोहोचता आलं नाही, पण ऋतुराजने कर्णधार आणि फलंदाज म्हणून आपली छाप सोडली.
हेही वाचा :
पैशांची चणचण भासते वैवाहिक जीवनात तंटा शास्त्रानुसार हळदीचे उपाय करा
राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी; एक दरवाजा बंद
राघव चड्ढामुळे परिणीती अस्वस्थ? लग्नानंतर परिणीची वादग्रस्त पोस्ट