सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक

नवी दिल्ली: भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या(Supreme Court) अधिकृत यूट्यूब चॅनलवर हॅकिंगचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. हॅकर्सनी सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक करून “XRP” नावाच्या क्रिप्टोकरन्सीच्या जाहिराती दाखवल्या. XRP ही क्रिप्टोकरन्सी यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सद्वारे विकसित करण्यात आली आहे. रिपल लॅब्सने यूट्यूबला दोष देत हॅकर्सना रोखण्यात अपयश आल्याचा आरोप केला आहे.

हॅकिंगच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. हॅकर्सनी सुप्रीम कोर्टाच्या(Supreme Court) चॅनेलवरील नियमित सुनावणीचे व्हिडिओ प्रायव्हेट करून त्याऐवजी “ब्रॅड गार्लिंगहाऊस: रिपल रिस्पॉन्स टू द एसईसी” या क्रिप्टो संबंधित विषयावर आधारित व्हिडिओ प्रसारित केला. हा व्हिडिओ XRP क्रिप्टोकरन्सीच्या किमतीच्या अंदाजावर केंद्रित होता.

सुप्रीम कोर्टाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी यूट्यूब चॅनेलवर ही समस्या दिसून आली, त्यानंतर न्यायालयाच्या आयटी विभागाने तातडीने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) कडे मदत मागितली आहे. अद्याप हॅकिंगच्या मूळ कारणांचा तपास सुरू आहे. या घटनेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हे देशातील सर्वात महत्त्वाच्या सुनावणींचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी वापरले जाते.

हेही वाचा:

सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, ​सणासुदीत लॉटरी लागणार

खुशखबर! जिओकडून ग्राहकांना मिळणार सर्वात मोठं गिफ्ट