कतरिना आणि विकी कौशलच्या खासगी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट उघड
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या खासगी आयुष्यातील सर्वात मोठा खुलासा झाला आहे(story). विकी कौशलने एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी महत्त्वाची माहिती उघड केली आहे. या खुलाशामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे.
खरंतर ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच(story) झाला तेव्हा काही पत्रकारांनी विकीला त्याची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या प्रेग्नन्सीबद्दल प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराने पॅप्सची बोलतीच बंद झाली. विकी-कतरिनाच्या लग्नाला ता जवळपास तीन वर्ष होत आली आहेत. कतरिना कैफ ही गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत.
विकी-कतरिना लंडनमध्ये फिरत असताना या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी तिची चाल, तिचे कपडे यावरून चाहत्यांनी अनेक तर्क वितर्क व्यक्त केले. कतरिनाच्या प्रेग्नन्सीबद्दल विकीला पहिल्यांदाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्ट उत्तर दिले.
‘बॅड न्यूज’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी, पत्रकारांनी विकी कौशलला विचारले की , खरी गुड न्यूज कधी येणार ? तो प्रश्न ऐकून इतर कलाकारांसह विकी कौशलही हसू लागला.त्यानंतर तो म्हणाला, ‘जेव्हा (ती गुड न्यूज) येईल तेव्हा मी तुम्हा सर्वांना सांगेन, पण सध्या तरी आम्ही आणत असलेल्या या ‘बॅड न्यूज’ (चित्रपटाचा) तुम्ही आनंद घ्या. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सर्वांना नक्कीच सांगेन.’असे विकीने स्पष्ट केले.
‘बॅड न्यूज’च्या ट्रेलर लाँचला या चित्रपटाशी संबंधित प्रत्येकजण उपस्थित होता. पण कार्यक्रमादरम्यान, मीडियाने विकी कौशलला खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून सर्वच हसू लागले.
‘बॅड न्यूज’ या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली झाली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. आनंद तिवारी हा एक अभिनेताही असून आता दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. बॅड न्यूज हा चित्रपट 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर सर्वांनाच आवडला आहे. या चित्रपटात विकी कौशलशिवाय तृप्ती डिमरी आणि एमी विर्क हे दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा :
लग्नाला पाच दिवस होताच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट
आनंदवार्ता, राज्यात पेट्रोल-डिझेलचा भाव घसरला, जाणून घ्या काय किंमती
राज्यातील भक्तांसाठी आनंदाची बातमी, अधिवेशनात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा