सांगलीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 3 दिवसांनी कोल्हापुरात सापडला

मोईन हा बॉक्सिंगचा प्रशिक्षक होता. सांगलीतील एका मुलीसोबत तीन(boxing coach) दिवसापूर्वी कृष्णा नदीकाठावर तो आला होता.शहरातील हनुमाननगर येथील एक युवक सेल्फी घेताना तोल जाऊन पाण्यात पडल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावरून तीन दिवसांपूर्वी  सेल्फी घेताना तोल गेल्याने वाहून गेलेल्या त्या तरुणाचा मृतदेह आज सापडला. पाण्याच्या प्रवाहात मोईन मोमीन हा तरुण वाहून गेला होता.

गेल्या 2 दिवसांपासून त्याच्या शोधासाठी विविध पथकांची शोधमोहिम सुरू होती. मात्र, दोन दिवसांच्या शोधमोहिमेत त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता. त्याच्या शोधासाठी आज सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात आली. सांगलीतून वाहून गेलेल्या मोईनचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी येथील नदीपत्रात तीन दिवसांनी आढळून आला. मोईन हा पट्टीचा पोहणारा होता, तरीही पाण्याच्या प्रवाहात तो स्वत:ला वाचवू शकला नाही. त्यासाठी, तब्बल 48 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. 

मोईन हा बॉक्सिंगचा प्रशिक्षक होता. सांगलीतील एका मुलीसोबत तीन दिवसापूर्वी कृष्णा नदीकाठावर तो आला होता. गेल्या आठवड्यात संततधार पाऊस सुरू असल्याने(boxing coach) कृष्णा नदी तुडूंब भरली आहे. सांगलीवाडीच्या बाजूने तो कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर चालत चालत आला, तेथेच तो मैत्रिणीसोबत सेल्फी घेत होता. मोबाईलवर सेल्फी घेताना मोईन नदी पात्रात पडला. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरडा केला.

काहींनी बंधार्‍याकडे धाव घेतली. तोपर्यंत मोईन दूरवर गेला होता. मैत्रिणीने मोईनच्या घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी नदीकाठावर धाव घेतली. तर, याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते देखील घटनास्थळी आले होते. स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन टीमने बोटीतून शोध घेतला. मात्र, पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेला तो युवक मिळून आला नाही. त्यामुळे, सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली.

म्हैसाळ बंधारा, हरिपूर येथून पुन्हा बंधाऱ्याजवळ शोध घेण्यात आला. पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध मोहीमेत अडथळा निर्माण होत होता. त्यानंतर, बचाव पथकाकडून आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी येथील नदीपत्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तातडीने पथक घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पाहण्याबाहेर काढला. त्यावेळी हा मृतदेह मोईन याचाच असल्याचे स्पष्ट झाले. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानंतर 48 तासानी तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातच (boxing coach)नदीपात्रात आढळून आला आहे.

दरम्यान, मोईन मोमीन हा बॉक्सर प्रशिक्षक होता, तो आई-वडीलासह हनुमाननगरमध्ये राहत होता. विशेष म्हणजे 1 महिन्यांपूर्वीच मोईनचा साखरपुडा झाला होता. त्यामुळे, त्याच्या मृत्युमुळे कुंटुबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

हेही वाचा :

अंजीर खाल्ल्याने मिळतात ‘हे’ फायदे…

महिन्याभराच्या विश्रांतीनंतर सोन्याच्या दाराला पुन्हा झळाळी!

मोदींची पुतीन यांच्याशी चर्चा; बाँबच्या आवाजात शांतता अशक्य