कंडक्टरला विसरून बस निघाली; प्रवाशाने करून दिली आठवण, पाहा…

लोकल, रिक्षा, टॅक्सी, बस आदी अनेक वाहतुकीचे (transportation)पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. ट्रेनपेक्षा काही प्रवाशांना बसचा प्रवासही सोयीस्कर वाटतो. कारण बसचा प्रवास हा कमी खर्चिक असतो. तसेच आता प्रवाशांसाठी एसी बसची सुद्धा सेवा सुरू केली आहे. काही ठिकाणी बसमध्ये चढण्यापूर्वी प्रवासी रांगेत उभे असताना कंडक्टरकडून पैसे देऊन तिकीट काढून घेतात. तर कधी बसमध्ये प्रवासादरम्यान कंडक्टरकडून पैसे देऊन तिकीट काढावे लागते. पण, जर प्रवासादरम्यान बसमध्ये कंडक्टरच नसेल तर… आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बस चालक कंडक्टरला विसरून पुढे निघून गेला आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, काही प्रवासी बसमध्ये बसले आहेत. त्यातील एका प्रवाशाला बसमध्ये कंडक्टर नाही असे लक्षात येते. तेव्हा तो अगदी प्रामाणिकपणे जाऊन बस चालकास सांगतो. प्रवाशाने सांगताच बस चालक रस्त्याकडेला बस थांबवतो. प्रवासी आपल्या जागेवर बसायला येताच सर्व प्रवासी हसायला सुरुवात करतात. तसेच बस चालकासह प्रवासी सुद्धा कंडक्टरची वाट पाहू लागतात. कंडक्टर बसमध्ये परत आले का? त्यांना बसपर्यंत कोण घेऊन आलं ? व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा .

हेही वाचा :

टी20 वर्ल्डकप मॅच फिक्सिंग? खेळाडूसोबत अशा पद्धतीने संपर्क!

रिक्षा चालकांसाठी गुडन्यूज; वर्षाला 300 रुपये भरा अन् ग्रॅच्युईटी मिळवा!

१२ कोटींचा पूल उद्घाटनाआधीच कोसळला.