‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान; म्हणाले, ‘ही योजना कधीही…’

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात(current political news) विविध घडामोडी घडत आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले, ‘काही लोकं टीका करत आहेत की ही योजना बंद पडेल. पण मी माझ्या लाडक्या बहीणांना सांगू इच्छितो की, ही योजना कधीही बंद होणार नाही. ही योजना संसाराला हातभार लावणारी आहे.’

पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन आज करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे उद्घाटन झाले आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे(current political news) यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘विरोधक दोन्ही बाजूंनी टीका करतात.

विकासकामं बघून विरोधकांना त्रास होतोय. काही जण विदेशात जाऊन देशाची बदनामी करत आहेत. विरोधकांना टीका केल्याशिवाय काही काम नाही. दरम्यान, मेट्रोचे भूमिपूजन आणि लोकार्पण हे पंतप्रधानांकडून होतंय ही कौतुकाची बाब आहे. पावसामुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून हा कार्यक्रम पुढे ढकलला होता. पण आता हा कार्यक्रम होत आहे’.

तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत ते म्हणाले, ‘ही योजना कधीही बंद होणार नाही. बहिणींनो, घाबरून जाऊ नका. ही योजना कधीही बंद होणार नाही. त्यामुळे महिलांनी निश्चिंत राहावं. टीका करणाऱ्या विरोधकांना आता लाडक्या बहीणी जोडा दाखवतील’.

मेट्रोसह भिडे वाडा स्मारकही होणार आहे. या स्मारकाचे भूमिपूजन पार पडले. याशिवाय, पुरंदरचं विमानतळही लवकर होणार आहे. शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही असा मोबदला द्या. जमीन लवकर अधिग्रहित करा. हे विमानतळ लवकर कार्यान्वित करा. सरकार यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

“गुरुवारी उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, पण पाऊस होता. लोकांना त्रास होऊ नये म्हणून मोदींनी कार्यक्रम पुढे ढकलला. कितीही संकटं आली तरी मोदीजी विकासकामांना ब्रेक देत नाहीत,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.

हेही वाचा :

बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन बेपत्ता! शहरांमध्ये लावले पोस्टर

आयपीएलमध्ये ‘माही’ पुन्हा येणार, पण यंदा करोडो रुपयांचं नुकसान होणार

मोठी बातमी! रिलायन्स-डिज्ने यांच्यातील कराराला केंद्र सरकारची मंजुरी

‘तर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारही होणार नाहीत…’?; संजय राऊतांना नेमकं म्हणायचंय काय?