पावसामुळे कपड्यांचा येणारा आंबट वास होईल छूमंतर

पावसाळ्यात कपडे न सुकने, ओले राहणे ही सामान्य समस्या आहे. (clothes)प्रत्येक घरात पावसाळ्यात कपडे हवे तसे वाळत नाहीत. त्यामुळे कपड्यांचा कुबट वास येतो. कपड्यांचा वास आल्याने आपल्याला ते अंगात परिधान करावेसे वाटत नाहीत.ओले आणि कुबट तसेच आंबट वास येणारे कपडे परिधान केल्याने सतत त्या वासाने आपलं डोकं दुखतं. शिवाय यामध्ये बॅक्टेरिया सुद्धा तयार होतात. असे कपडे परिधान केल्याने त्वचेशी संबंधित काही समस्या उद्भवतात. त्यामुळे आज या बातमीमधून कपडे वाळवण्यासाठी काही सिंपल टिप्स, तसेच कपड्यांचा वास येऊ नये यासाठी काय केले पाहिजे याची माहिती जाणून घेणार आहोत.

लिंबाचा रस

कपड्यांचा वास येऊ नये यासाठी लिंबाचा रस फार उपयुक्त ठरेल. तुम्ही कपडे धुवून झाल्यावर एक बालदी पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्या. त्यानंतर यामध्ये धुतलेले कपडे टाका. कपडे यात छान भिजू द्या. त्यानंतर कपडे पिळून घ्या. लिंबाचा रस कपड्यांमध्ये उतरल्याने कपड्यांचा वास येत नाही. तसेच बॅक्टेरीया सुद्धा कपड्यांमध्ये जमा होत नाहीत. त्यामुळे कपड्यांमध्ये लिंबाचा रस मिक्स करा.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

कपड्यांमधून येणारा कुबट वास बंद व्हावा यासाठी त्यामध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करा. ही स्टेप देखील कपडे धुवून झाल्यानंतर करायची आहे. त्यासाठी एका बकेटमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करा. (clothes)त्यात कपडे भिजवून सुकत ठेवा. असे केल्याने सुद्धा कपड्यांमधील दुर्गंध दूर होतो.

फॅन सुरू ठेवा

पावसाळ्यात बाहेर पाऊस पडत असल्याने सूर्यप्रकाश येत नाही. त्यामुळे आपण घरात कपडे सुकण्यासाठी ठेवतो. अशावेळी घरात तुम्ही ज्या ठिकाणी कपडे सुकण्यासाठी ठेवाल ती जागा मोकळी असली पाहिजे. तसेच घरातील फॅन बंद ठेवू नका. कपडे वाळण्यासाठी फॅन सुरूच ठेवा. त्यामुळे कपड्यांचा खराब वास देखील येत नाही आणि कपडे सहज वाळतात.

रोजच्यारोज कपडे धुवा

आपण आपले रोजचे कपडे रोज धुतले पाहिजेत. (clothes)कारण कपडे रोज न धुता जर साठवून ठेवले तर एकाच दिवशी जास्त कपडे पडतात. एकाच दिवशी जास्त कपडे असल्यास ते लगेच सुकत सुद्धा नाहीत. शिवाय त्यांना सुकवण्यासाठी घरात जागा कमी पडते. त्यामुळे दाटीवाटीने आपण कपडे सुकत टाकतो. त्यामुळे हवा लागत नाही आणि कपड्यांचा वास येण्यास सुरुवात होते.

हेही वाचा :

पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? हे हेअर मास्क ठरतील फायदेशीर;

कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

चिपळूणमध्ये बनावट नोटा छापण्याचे रॅकेट उद्ध्वस्त, चौघे अटकेत