मोबाईल टॉर्चमध्ये सभा घ्यावी लागल्याने कॉंग्रेस नेत्याने थेट शिव्या हासडल्या
राज्यात विधानसभेचा प्रचार जोरात सुरू असून विदर्भातही राजकारण तापलं आहे. दरम्यान कॉंग्रेसचे(politics) नेते विजय वडेट्टीवार याच्या प्रचारासाठी त्यांची कन्या आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यातील आकापूर गावात सभा घेतली, मात्र गेल्या तीन दिवसांपासून या भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईल टॉर्चमध्ये सभा घ्यावी लागल्यामुळे संतापलेल्या शिवानी वडेट्टीवार यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लाखोली वाहिली.
राज्यात सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. तरीही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा सातत्यांने खंडित होत असतो. काही वेळा तर दोन-तीन दिवस वीज नसते. आता ऐन निवडणुकीतही(politics) सावली तालुक्यातील आकापूर गावात गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
त्यातच शिवानी वडेट्टीवार यांची या यावात काल रात्री सभा झाली. मात्र गावात अंधार असल्यामुळे त्यांना मोबाईलच्या टॉर्चमध्ये सभा घ्यावी लागली. त्यामुळे सभेत त्यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. निवडून आल्यानंतर या सर्वांना दाखवते असा दम देखील दिला.
तुमच्या जीवनात अंधार पेरण्याचं काम भाजप करत आहे आणि विकास कोणाचा होत आहे तर गुजरातचा, तुमच्या गावचा नाही. उद्या विजय वडेट्टीवार यांना मोठ्या पदावर जाऊ द्या, मग या सर्वांना इंगा दाखवू. ते विरोधी पक्ष नेते आहेत.
ते उद्याचे मुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांना विजयी करा, असं आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केलं. यावेळी त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिव्याही हासडल्या. दरम्यान त्यांची ही शिवराळ भाषा टीकेचा विषय ठरली आहे. यावेळी ग्रामस्थांनी देखील शिवानी वडेट्टीवार यांच्याकडे महावितरण कंपनीच्या विरोधात लेखी निवेदन व तक्रारी दिल्या आहे.
हेही वाचा :
राज्यात नवीन अभियान सुरु; “जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू”
एकाने बायको उभी केली तर दुसऱ्याने बाबू उभा केला; बच्चू कडू
मतदारसंघातील CM एकनाथ शिंदेंची सभा रद्द झाली, उमेदवाराला फुटला घाम!