महाविकास आघाडीत विधानसभा जागा वाटपाची तारीख ठरली!

फोडाफोडीच राजकारण आता होणार नाही, जनतेला पाहिजे (success)असं महाविकास आघाडीच सरकार असेल. कुणी कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यामध्ये भांडण लागणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना मोठं घवघवीत यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे या पक्षांमध्ये महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण याबाबत वाद रंगला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हे महाविकास आघाडीतील  तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार का? आणि लढल्यास कोणाला किती जागा मिळणार याबाबतच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील  यांनी जागा वाटपाबाबत विधान केलं आहे.

सतेज पाटील म्हणाले , “केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील मित्र पक्षांना पुरेसं स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे लोकसभा हा एकच उद्देश भाजपाचा होता, लोकसभेपुरता वापर करायचा आणि नंतर त्यांचा विचार करायचा नाही, हे भाजपच्या कृतीतून आता सिद्ध झाले आहे. पक्षांच्या फोडफोडीतून भाजपला फक्त लोकसभेसाठी बहुमत मिळवायचं होत. आता लोकसभेनंतर दोन्ही पक्षच किती अस्तित्व ठेवणार हे आता भाजपच्या कृतीतून दिसून आलं आहे,”

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (success)यांनी विधानसभेला किती जागा हव्यात याबाबत आत्ताच विधान केला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या निमित्ताने भाजपचा मित्र पक्षांमध्ये असलेली खदखद बाहेर आली आहे.महाविकास आघाडीमध्ये कोण मोठा भाऊ कोण लहान भाऊ याबाबतचा खुलासा महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथ यांनी केला आहे. विधानसभेच्या जागा वाटताना बाबत सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे एक दोन जागा सोडल्या तर लोकसभेला जागा वाटप सुरळीतपणे झाले. २८८ जागांचे वाटप विधानसभेला पण होणार आहे. जून अखेरपर्यंत या जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात होईल, असे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाला जास्त जागा मिळणे अपेक्षित होतं. तर त्या जागा त्यांना मिळाल्या नाही, उलट उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं त्याला उत्तर देताना सतेज पाटील म्हणाले, त्यांनी किती प्रयत्न केला तरी आमच्यात भांडण लागणार नाही.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षांचा(success) एकमेकांना फायदा झाला. ही तिघांची एकत्रित राहतात विधानसभेला देखील लोकांना अपेक्षित आहे. फोडाफोडीच राजकारण आता होणार नाही, जनतेला पाहिजे असं महाविकास आघाडीच सरकार जनतेला अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी किती भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या भांडण लागणार नाही, असे सतेज पाटील म्हणाले.”महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिपद मिळाले याचे स्वागत आहे, पुण्याला आणि महाराष्ट्राला मंत्रिपद मिळाले,फक्त आता अपेक्षा जास्त जास्त निधी गुजरातकडे न जाता तो महाराष्ट्र यावा, आणि उद्योग पण महाराष्ट्रच राहावे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा :

लग्नावरून वाद टोकाला गेला, प्रियकराकडून प्रेयसीची डोक्यात दगड घालून हत्या

आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळं कोल्हापुरात पुराची समस्या

जातीतील मुलीशी प्रेमविवाह तरीही बापाने मुलाला संपवले