“राऊतांच्या अंगात आलेलं न गेल्यानं सरकारच गेलं”; विश्वजीत कदमांची खोचक टीका

लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगली मतदारसंघाची देशभरात चर्चा झाली होती. या मतदारसंघातील उमेदवारीवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये(congress) ताणाताणी झाली होती. आरोप प्रत्यारोपही झाले होते. यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही सांगली जिल्हा चर्चेत आला आहे.

काँग्रेस(congress) आमदार विश्वजीत कदम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दातं टीका केली आहे. २०१९ मध्ये संजय राऊत यांच्या अंगात आल्याने महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. पण त्यानंतरही राऊत यांच्या अंगातील कधी उतरलेच नाही. त्यामुळे सरकार आले तसे गेले असे कदम म्हणाले.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात आमदार कदम यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना त्यांनी राऊत यांना खोचक टोले लगावले. कदम म्हणाले, २०१९ मध्ये जेव्हा मी निवडून आलो तेव्हा मला असे वाटले नव्हते की आमचे सरकार येईल. पण संजय राऊत यांच्या अंगात आले आणि आमचे सरकार आले. पण पुढे अडचण अशी आली की संजय राऊत यांच्या अंगात आलेले काही लवकर गेले नाही त्यामुळे सरकारही गेले.

यानंतर त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. पॉस्कोन नावाची कंपनी महाराष्ट्रात येणार होती. पण दिल्लीतून फोन आला आणि महायुतीच्या नेत्यांना ही कंपनी गुजरातला द्यावी लागली. महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राला दिल्ली आणि गुजरातपुढे झुकवले. पण आता राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभी असून आम्ही हा महाराष्ट्र कुणाच्या बापापुढे झुकू देणार नाही असे कदम म्हणाले.

हेही वाचा :

‘या’ जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

“सरकार स्थापनेसाठी शरद पवार आणि भाजपात..”; अजित पवारांचा महागौप्यस्फोट

कोल्ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकून तरूणीवर केला अत्याचार; व्हिडिओही काढला अन् तब्बल चार वर्षे…