स्टेजवरच जबरदस्ती करायला लागला वर, मग वधूने असे हाणले… Video Viral

लग्नसमारंभ एक असा सोहळा आहे जिथे अनेक निरनिरळ्या गोष्टी घडत असतात. कोणी बेफान होऊन नाचत असत तर कुणाची भांडण सुरु असतात. नुकतीच एका लग्नादरम्यान अशीच एक घटना घडल्याचे पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल(Viral) होत आहे. व्हिडिओमध्ये वधू-वरांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्य म्हणजे हे भांडण इतके मोठे रूप घेते की वर-वधू स्टेजवरच एकमेकांची धुलाई करू लागतात. लग्नातील हा राडा आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोक आता याची मजा लुटत आहेत.

व्हायरल (Viral)व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात वर वधूला जबरदस्तीने मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. पण वधूने त्याच्या हातातील मिठाई खाण्यास नकार देते. यानंतर वर वधूला जबरदस्तीने मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करू लागतो. तो अक्षरशः ही मिठाई वधूच्या तोंडात कोंबायचा प्रयत्न करतो. यावर वधूचा मूड खराब होतो आणि ती रागात त्याला जोरदार थप्पड मारते.
वधूकडून मार खाल्ल्यानंतर वरालाही आपला राग अनावर होतो आणि तोही वधूला मारहाण करू लागतो. काही क्षणातच लग्नाचे हे वातावरणात नवीन रूप घेते आणि हे पाहून वऱ्हाडीही थक्क होतात. लग्नातील पाहुणे वधू-वर अशाप्रकारे भांडताना पाहून हैराण होतात. बरेच पाहुणे स्टेजवर वधू आणि वर यांच्यातील भांडण शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु ते त्यांच्या प्रयत्नांमध्ये अयशस्वी ठरतात. वधू आणि वर सतत एकमेकांना हाणत राहतात आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. वर वधूमधील हे भांडण तेथील एकजण आपल्या कॅमेरात कैद करतो आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो.
Kalesh B/w Husband and Wife in marriage ceremony pic.twitter.com/bjypxtJzjt
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 13, 2022
लग्नसमारंभातील भांडणाचा हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला, ‘लग्न समारंभात पती-पत्नीचा कलेश’ कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का? गेल्या काही दिवसांत मी पाहिलेली ही सर्वात मजेदार गोष्ट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इथेच अशी अवस्था आहे चुकून यांचे लग्न झाले तर हे एकमेकांचा जीव घेतील”.
हेही वाचा :
महिला दिनी पंतप्रधान मोदींनी उचललं मोठं पाऊल!
Jio चा ‘हा’ प्लॅन घ्या, 90 दिवसांपर्यंत रोज फ्री 2GB डेटासह OTT चा आनंद घ्या
श्रीमंत बापाच्या पोराचा भररस्त्यात ‘नंगानाच’; पहिले लघूशंका केली अन् मग… Video