जेवताना एका बाजूने घास चावण्याची सवय धोकादायक; तज्ज्ञांचा नवा इशारा
जेवताना एका बाजूनेच घास चावण्याची सवय अनेकांना असते, परंतु ही सवय आपल्या दात आणि मुखाच्या (health)आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा दंततज्ज्ञांनी दिला आहे. प्रतिमपुरा येथील क्राउन हब डेंटल क्लिनिकच्या एमडीएस (प्रोस्टोडोन्टिस्ट), बीडीएस, डॉ. नियती अरोरा यांनी या सवयीच्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली आहे.
डॉ. अरोरा यांच्या मते, “जेवताना एका बाजूने घास चावण्याची सवय मुळे जबड्याच्या दातांची असमान झीज होते, ज्यामुळे कॅल्क्युलस आणि टार्टर जमा होऊन दात आणि हिरड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच, या सवयीमुळे चेहर्याचा आकारही बदलू शकतो, ज्यामुळे टीएमजे जॉइंट्समध्ये वेदना आणि अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते.”
या समस्यांपासून वाचण्यासाठी दोन्ही बाजूंनी सममितीने घास चावण्याची शिफारस त्यांनी केली आहे. तसेच, जर एका बाजूने चावताना अस्वस्थता किंवा वेदना जाणवत असेल, तर तात्काळ दंतचिकित्सकाचा सल्ला घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा :
‘देवमाणूस’ चा किरण गायकवाड दिग्दर्शकपदी, प्रसाद ओक यांच्यासोबत ‘एफ.आय.आर. नंबर ४६९’ मध्ये