पायावर पाय टाकून बसण्याची सवय आरोग्यासाठी खूपच घातक या गंभीर आजारांचा धोका

अनेकांना काय जवळपास सर्वांनाच पायावर पाय टाकून बसण्याची सवय (crossed)असते. बरेच जण पायावर पाय टाकून बसण्याच्या पद्धतीला स्टाईल स्टेटमेंट समजतात. मात्र, पायावर पाय टाकून बसण्याची सवय आरोग्यासाठी खूपच घातक आहे. या सवयीमुळे अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. जाणून घेऊया या सवयीचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो. अनेकांना पायावर पाय टाकून बसणे खूपच आमरामदायी वाटते. तर काहींना अशा प्रकारे बसल्यामुळे खूप कॉन्फिडंट वाटते. यामुळे अनेकांना पायावर पाय टाकून बसण्याची सवय पडते. मात्र, पायावर पाय टाकून बसण्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. यामुळे अनेक शारिरीक समस्या निर्माण होऊ शकतात.

पायावर पाय टाकून बसल्याने शरीरात होणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे व्हेरिकोज व्हेन्स शिरांना सूज येणे या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. पायावर पाय टाकून गर्भवती महिलांसाठी सर्वाधिक हानिकारक ठरु शकते. कारण गर्भधारणेदरम्यान रक्त प्रवाह पूर्वीपेक्षा कमी होतो. यामुळे (crossed) पायावर पाय टाकून बसल्यास पाय दुखू शकतात. पायांना सूज येऊ शकते तसेच शरिरात थकवा जाणवू शकतो. गर्भवती महिलांनी पायावर पाय टाकून बसल्यास गर्भाच्या स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. प्रसूतीच्या वेळी अडचण निर्माण होऊ शकते. किंवा प्रसुतीच्या वेळेस गुंतागुंत होऊ शकते.
एका अभ्यासातून असे समोर आले आहे की पायावर पाय टाकून बसल्याने रक्तदाबाचा धोका 8 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. पायावर पाय टाकून बसल्याने धमन्यांवर दबाव येतो, ज्यामुळे हृदय (crossed)अधिक काम करते. अशा परिस्थितीत, आधीच उच्च रक्तदाबाची समस्या असेल पायावर पाय टाकून बसण्याची लगेच बंद करा. पायावर पाय टाकून बसल्याने पाठीच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे पाठदुखी, मान आणि खांदे दुखी होऊ शकते. पायावर पाय टाकून बसण्याची सवय दर 30 मिनिटांनी बसण्याची स्थिती बदलत राहा. दर तासाला काही मिनिटे उठा आणि हालचाल करा. याशिवाय, नियमित व्यायाम करा, त्यामुळे स्नायू मजबूत होण्यास आणि लवचिकता वाढण्यास मदत होते
हेही वाचा :
ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी
सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन?
महिला दिनी लाडक्या बहिणींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार
लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी- मार्चचे पैसे कधी येणार? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली