क्रुरतेचा कळस! चालत्या रिक्षामध्ये महिलेवर सामुहिक अत्याचार
नवी दिल्ली : देशामध्ये महिलांवरील(woman) अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी दिल्लीमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा दिल्लीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली.
मागील महिन्यामध्ये एक महिला(woman) अत्यंत बिकट अवस्थेमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. 11 ऑक्टोबरच्या रात्री नौदलाच्या अधिकाऱ्याला काले खान भागात रस्त्याच्या कडेला ही महिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळली. नौदलाच्या जवानांनी तिला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. तसेच पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणाबाबत आता धक्कादायक बाब समोर आली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये असा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा शोध सुरु केला. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या पीडित महिलेसोबत पोलिसांनी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न केला.
मात्र त्या मुलीची मानसिक स्थिती योग्य नसल्यामुळे आणि घडलेल्या घटनांमुळे तिला मोठा धक्का बसला असल्यामुळे पीडित मुलगी याबद्दल काहीच बोलू शकली नाही. त्या महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणी अहवालात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ओरिसातील रहिवासी असलेल्या या 34 वर्षीय पीडित महिलेने नर्सिंगचे शिक्षण घेतले असून ती गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत राहत होती. या प्रकरणाच्या तपासामध्ये के आढळून आले की, चालत्या ऑटोमध्ये तीन जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. राजघाटाजवळील गांधी स्मृती रस्त्यावरही पोलिसांनी तरुणीचे रक्त आणि कपडे जप्त केले आहेत.
तब्बल महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी गँगरेपच्या तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच ज्या ऑटोमध्ये मुलीवर बलात्कार झाला ती ऑटो जप्त करण्यात आली आहे. ऑटो चालवणारा प्रभु, भंगार दुकानात काम करणारा प्रमोद आणि शमशुल अशी आरोपींची नावे आहेत. ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनीही याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास अहवाल मागितल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हे तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
हेही वाचा :
मोबाईल टॉर्चमध्ये सभा घ्यावी लागल्याने कॉंग्रेस नेत्याने थेट शिव्या हासडल्या
राज्यात नवीन अभियान सुरु; “जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू”
मध्यधुंद अवस्थेत तरूणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर तोल गेला अन्; घटनेचा थरारक VIDEO