सध्या देशात प्रेमाच्या नावाखाली वेडेपणाचे उद्योग जरा जास्तचट वाढले असून अनेक धक्कादायक प्रकारही उघडकीस येत आहेत.(madness )पण यावेळी एखाद्या प्रियकराची, नवऱ्याची हत्या झालेली नाही. पण यावेळी तर प्रेमाच वेड्या झालेल्या यआईने प्रियकरासोबत मिळून तिच्याच पोटच्या लेकीची हत्या केली. तिच्या छातीवर उभं राहून मुलीचा जीव घेतला आणि तिचा मृतदेह तसाच बेडमध्ये ठेवला. कीड लागलेल्या त्याच बॉडीसमोर त्या महिलेने प्रियकरासोबत शरीरसंबंधही ठेवलं, डारू पार्टीदेखील केली.खरंतर, हे भयानक प्रकरण उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील आहे. कैसरबागच्या खंडारी बाजारात राहणाऱ्या शाहरुखचे सुमारे 10 वर्षांपूर्वी रोशनी उर्फ नाजशी लग्न झाले होते. त्यांना 7 वर्षांची मुलगी सायनारा उर्फ सोना होती. रोशनी एक बार डान्सर आहे. ती 4 वर्षांपासून एका तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याच्यासोबत राहण्यासाठी तिने तिच्या मेहुण्या, सासू आणि दोन वहिनींना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवले. तिने तिच्या पतीला मारहाण केली आणि घराबाहेर हाकलून लावले. त्यानंतर, ती तिच्या सासरच्या घरात तिच्या प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.
मात्र 14-15 जुलैच्या रात्री 3 वाजताच्या सुमारास, रोशनीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की तिच्या पतीने त्यांच्या मुलीची हत्या केली आहे.(madness ) ही माहिती मिळताच पोलिस तिथे पोहोचले तेव्हा रोशनीने त्यांना सांगितले की तिचा पती शाहरुख घरी आला होता. भांडण झालं आणि त्याने त्यांच्या मुलीची हत्या केली आणि पळून गेला. पण पोलिसांनी मुलीचा मृतदेह तपासल्यावर त्यांना वेगळाच संशय आला. कारण त्या मृतदेहातून खूप दुर्गंध येत होता, त्यात कीडेही झाले होते. त्यामुळे ही हत्या 1-2 दिवसांपूर्वीच ही हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत होते. पोलिसांना रोशनी आणि तिचा प्रियकर उदित यांच्यावर संशय आला.अखेर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन खडसावून चौकशी केली तेव्हा रोशनीचा प्रियकर उदित जयस्वाल याने सगळं कबूल करत सत्य सांगितलं. त्याच्या सांगणायनुसार, सुमारे 4 वर्षांपूर्वी समिट बिल्डिंगच्या क्लबमध्ये रोशनीला भेटला होता. त्याला तिचा डान्स खूप आवडला , हळूहळू ते जवळ आले आणि लिव्ह-इनमध्ये राहू लागले.
उदितने सांगितलं की रोशनीचा नवरा आणि कुटुंबियांचा त्यांच्या या नात्याला विरोध होता. अखेर योजनेनुसार, रोशनीचा मेहुणा, सासू आणि दोन्ही नणंदा यांना तुरुंगात पाठवण्यात आले. 13 जुलै रोजी रोशनी आणि तिचा प्रियकर उदितने त्यांची 7 वर्षांची मुलगी सायनारा हिचा गळा दाबून आणि तोंड दाबून हत्या केली. (madness )ती मरण पावल्यावर रोशनी तिच्या पोटावर चढली, त्यामुळे तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले. तिने तिचा प्रियकर उदितच्या कपड्याने रक्त साफ केले. त्यानंतर तिने मुलीचा मृतदेह बेड बॉक्समध्ये ठेवला.मात्र जेव्हा दुर्गंध येऊ लागला तेव्हा तिने आणि उदितने मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि एसीसमोर ठेवला. त्यानंतर त्यांनी शरीरावर परफ्यूम स्प्रे करून वास कमी करण्याचा प्रयत्न केला आणि खोली फिनाईलने धुतली. त्यानंतर त्यांनी मुलीच्या मृतदेहासमोरच दारूची पार्टी केली. त्यानंतर रोशनी आणि उदित यांनीही ड्रग्ज घेतले. दारू पिऊन ते झोपी गेले. रात्री जागे झाल्यावर त्यांनी पोलिसांना फोन केला.
डॉक्टरांच्या पॅनेलने रोशनीची मुलगी सोनाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले. गुदमरल्यामुळे सोनाचा मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे तिचे तोंड आणि त्याचा गळा दाबण्यात आला होता. पोस्टमॉर्टमच्या 36 ते 48 तास आधी तिचा मृत्यू झाला. याचा अर्थ खून रविवारी सकाळी किंवा रात्री झाला होता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :