माझा पती दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध..’ भाजप नेत्याच्या मुलाचे १३० अश्लील व्हिडिओ व्हायरल

मध्य प्रदेशातील मंदसौर येथील राजकीय नेत्याचा महामार्गावरील आक्षेपार्ह व्हिडिओचं प्रकरणा (political)ताजे असतानाच यूपीतील एका भाजप नेत्याच्या मुलाचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मैनपुरी जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ता याचे सोशल मीडियावर १३० हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले असून, या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे .

शुभम गुप्ता विवाहित असून, त्याची पत्नी शीतल गुप्ता यांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिलेनं आरोप करत तक्रारीत म्हटलं की, शुभमने विविध महिलांसोबत अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते दाखवून मानसिक छळ केला. तसेच शारीरिक त्रास दिला आणि पालकांकडून हुंड्यासाठी चारचाकी वाहनाची मागणी केली. या प्रकरणी शीतल गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .

या प्रकरणात आणखी एक महिला पुढे आली असून, तिचे म्हणणे आहे की, (political)ती आणि शुभम यांच्यातील संबंध वैयक्तिक होते आणि व्हिडिओ व्हायरल करण्यामागे शीतल गुप्ता आणि इतर दोन व्यक्तींकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न होता. या आरोपांवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपवर विरोधकांनी टीका केली आहे. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आलोक शाक्य यांनी भाजप नेत्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, 2027 च्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल, असे म्हटले आहे. काँग्रेसनेही या प्रकरणाची सखोल चौकशी करून(political) दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे .सध्या पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, आरोपी शुभम गुप्ता फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे आणि लवकरच त्याला अटक केली जाईल, असे सांगितले आहे.

हेही वाचा :