बायकोची चारित्र्याच्या संशयावरुन हत्या आत्महत्येचा केला बनाव
पुणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढत(define character) चाललं आहे. त्यातल्या त्या पुण्यामध्ये हे प्रमाण जास्त दिसत आहे. मर्डर, बलात्कार, दरोडा अशा अनेक प्रकारचे घडामोडी घडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात पुन्हा एकदा घडला आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीनेच पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बवान केला.
मात्र, पोलिसांनी पतीचा प्लॅन(define character) उघड केला आहे. त्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील सहकारनगरमधील धनकवडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्नील शिवराम मोरे (वय ३०, रा. घोरपडी पेठ) असं अटक करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे.
या घटनेत अंजली स्वप्नील मोरे (वय २९) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त नंदिनी वाग्यांनी, पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, उपनिरीक्षक युवराज पोठेरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील आणि अंजली यांचा काही वर्षांपुर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुलं आहेत. पण, स्वप्नील हा अंजली यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात सतत वाद होत होते. त्यामुळे ते विभक्त देखील राहत होते. अंजली या धनकवडी येथील चव्हाणनगर येथे मुलांसोबत राहत होत्या. तर, स्वप्नील घोरपडी पेठ येथे आईसोबत राहत होता.
दरम्यान, आज शनिवारी अंजली या गळफास लावलेल्या अवस्थेत राहत्या घरात आढळून आल्या होत्या. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल केले. तेव्हा त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस आत्महत्येबाबत तपास देखील करत होते.
तेव्हा पोलिसांना पतीने गळा दाबून खून केला आणि त्यानंतर फासावर लटकवून गेला असल्याचं समजलं. आरोपी पती काहीही केलं नसल्यासारखं वागत आहे, अशी माहिती मिळाली. लागलीच पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने हत्येची कबूली दिली. त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला. खूनानंतर तिला फासावर लटकवून तो बाहेर पडला, असल्याचे त्याने सांगितलं.
हेही वाचा :
मोठी बातमी! पुढील आठवड्यात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार?
‘विराट पाकिस्तानमध्ये आला तर…’, आफ्रिदी स्पष्टच बोलला
अजित पवार तडकाफडकी दिल्लीला, काहीतरी मोठं घडणार; आमदारांची धाकधूक वाढली