काकीच्या नजरेत भरला पुतण्या दोघे परस्परांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले की एकदिवस

असं म्हणतात, प्रेम कधीही, कुठेही आणि (deeply)कोणावरही होऊ शकतं. त्यावर कोणाचं नियंत्रण नसतं. मग, त्यात काय चूक, काय बरोबर. प्रेमात पडलेल्या माणसाला त्याच्या उद्दिष्ट्यापर्यंत पोहोचवणारी प्रत्येक एक गोष्ट योग्य वाटते. आता असच एक प्रकरण उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये समोर आलं आहे. इथे पुतण्याच्या प्रेमात पडलेल्या काकीने घरदार सोडून दिलं. नवरा आणि पदरात असलेल्या दोन मुलांची सुद्धा तिला दया आली नाही. आता ती असा हट्ट करतेय ज्यामुळे नवरा हैराण झालाय.

पुतण्याची सुद्धा काकीसारखी अवस्था आहे. त्याला काकीसोबत लग्न करुन संसार थाटायचा आहे. पोलिसांनी दोघांनी खूप समजावलं. मात्र, तरीही दोघे एकत्र राहण्याच्या हट्टाला पेटले आहेत. हे अजब-गजब प्रकरण कोतवालीच्या लक्सर पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. सदर महिलेच आठ वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. तिला पाच आणि सात वर्षाची दोन मुलं आहेत. 28 वर्षाच्या काकीच बऱ्याच काळापासून पुतण्यासोबत अफेयर सुरु (deeply)होतं. दोघे परस्पराच्या प्रेमात आकंठ बुडून गेले होते. अखेर एकदिवस असा आला की, दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
नवऱ्याच घर सोडलं
महिलेने पुतण्यासोबत राहण्यासाठी नवऱ्याच घर सोडलं. नातेवाईकांनी दोघांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. पण ते ऐकले नाहीत. त्यानंतर महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी काकी आणि पुतण्याला पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं, त्यांना समजावलं. पण त्यांनी पोलिसांच सुद्धा (deeply)ऐकलं नाही.

शेवटपर्यंत तिच्या निर्णयावर ठाम
सुल्तानपुर चौकीचे प्रभारी वीरेंद्र सिंह नेगी यांनी सांगितलं की, महिलेला काहीही झालं, तरी नवऱ्यासोबत रहायच नाहीय. महिलेने पुतण्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. महिला शेवटपर्यंत तिच्या निर्णयावर ठाम राहिली. अखेर पोलिसांनी महिलेला पुतण्यासोबत पाठवलं. पण महिलेला समजावण्याचे संबंध पुढेही सुरु राहतील, जेणेकरुन तिचा संसार वाचेल.
हेही वाचा :
‘पुष्पा’फेम अल्लू अर्जुन बदलणार स्वत:चं नाव! नेमकं कारण काय ?
रात्री भाड्याच्या घरात बोलावलं १७ वर्षीय मुलीसोबत संबंध ठेवून पोलीस फरार
डिप्रेशनमुळे नवऱ्याने आयुष्य संपवलं; अभिनेत्रीचा 4 वर्षांचा संसार संपला पण…