पुढील निवडणूक शेवटची’ हसन मुश्रीफांचं मोठं विधान चर्चेत..
कागल विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला सहाव्यांदा निवडून दिले. (un report)त्यांचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. आणखी एक विधानसभेची निवडणूक लढविण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणूकसुद्धा मी लढविणार आहे. ती माझी शेवटची विधानसभा निवडणूक असेल,’ असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ‘त्या निवडणुकीनंतर त्यापुढची लोकसभेची निवडणूक लढवून खासदार होणे व केंद्रात मंत्री होण्याचे माझे स्वप्न आहे’, असे ते म्हणाले.येथील विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘एक लोकप्रतिनिधी दीनदलित, गोरगरीब सर्वसामान्यांची सेवा बजावत असेल तर मतदारसंघातील लोक कसे पाठीशी राहतात, हे या निवडणुकीतून दिसून आले आहे. गडहिंग्लज येथील पीडित कुटुंबाची आपण भेट घेतली नाही, अशी टीका विरोधकांकडून होत आहे.मात्र, ज्यावेळी एखाद्या पीडितेवर अन्याय होतो, अशा वेळी त्या पीडितेचे व तिच्या कुटुंबीयांचे नाव सार्वजनिक करायचे नसते. (un report)तसे झाल्यास समाजात त्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो आणि त्या पीडितेचे पुनर्वसन होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात.
या प्रकरणातील नराधम लवकरात लवकर कसा पकडला जाईल व त्याला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल, हे लोकप्रतिनिधीनी पाहणे आवश्यक आहे, ते मी करीत आहे.’‘दूधगंगा डाव्या कालव्याला पनोरीजवळ भगदाड पडले आहे. या कामासाठी २५ दिवसांचा अवधी लागणार असेल, तर कॅनॉलला पाणी येणार नाही. त्यामुळे ऊस पिकाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे,’ अशा सूचना आमदार मुश्रीफ यांनी दिल्या. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी कारखान्यांनी या(un report) विभागातील ऊस लवकरात लवकर तोडून न्यावा. याबाबतचे नियोजन कारखान्यांनी करावे, असेही त्यांनी सांगितले.
‘महायुतीच्या जाहिरातीमध्ये अनावधानाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो राहून गेला असेल. राजर्षी शाहू महाराजांना बाजूला करणे हे आमच्या मनात देखील नाही. त्यामुळे चुकून राहून गेलेल्या फोटोबद्दल मी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो’, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.‘शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रद्द झाला आहे. याबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. सांगलीपर्यंतच्या शेतकऱ्यांनाच जर महामार्ग हवा असेल तर आपण कसे नको म्हणणार. या महामार्गावरून पुढे गोव्याला कसे जायचे? हे सरकारच ठरवेल’, असे आमदार मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना सांगितले.
हेही वाचा :
विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात:नवनिर्वाचित आमदार घेणार शपथ
IND VS AUS मॅचमध्ये राडा, संतापलेल्या सिराजने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बॉल फेकून मारला
राज ठाकरे म्हणजे भाजपाच्या हातातलं खेळणं; फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर राऊतांची फटकेबाजी