पोस्ट ऑफिसची योजना भारी; बँकेच्या एफडीपेक्षा करा जादा कमाई

टपाल खात्याच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत(post office plan) गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळतो. बँकेच्या ठेव योजनेपेक्षा त्यात अधिक कमाई होते. व्याज चांगले मिळते. तर कमाईवर कर बचत होते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक(post office plan) फायदेशीर ठरेल. कर बचतीसह गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळतो. National Saving Certificate पोस्ट खात्याच्या या योजनेत, बँकेतील एफडीवरील व्याजापेक्षा अधिक लाभ मिळतो.

या योजनेतंर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 7.70 टक्के व्याजदराचा लाभ मिळाला. या योजनेत तुम्ही एकूण 5 वर्षांसाठी गुंतवणूक करु शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यावर कर बचतीचा लाभ मिळतो.

या योजनेत तुम्ही आयकर खात्याच्या कलम 80सी अतंर्गत 1.50 लाख रुपयांची सवलत मिळते. साधारणपणे बँकांमध्ये 5 वर्षांच्या एफडी योजनेवर 7 ते 7.50 टक्के व्याजाचा लाभ मिळतो. त्यापेक्षा NSC योजनेत जादा रिटर्न मिळत आहे.

या योजनेत तुम्ही 1000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकता. या योजनेत अधिक गुंतवणूक करण्यास कोणतेही बंधन नाही. तुम्ही जवळच्या पोस्ट कार्यालयात एनएससीसाठी खाते उघडू शकता.

हेही वाचा :

मोदी, ठाकरे, पवारांनंतर मनोज जरांगेही…

कार्यकर्त्यांनो दोन्ही सभेत दिसू नका, कुणा एकाचं कुंकू लावा : अजित पवार

आरक्षण न मिळाल्यास विधानसभेच्या आखाड्यात उतरणार : मनोज जरांगे