जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील जळगाव येथील एका ३ वर्षाच्या मुलाला ‘जीबीएस’ आजाराची(disease) लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. या रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या मुलाला गेल्या काही दिवसांपासून पाय दुखण्याची तक्रार होती, त्यानंतर रक्त तपासणीत तो ‘जीबीएस’ आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात आतापर्यंत ‘जीबीएस’चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका महिला रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका तरुण आणि एका मुलावर उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हा धोकादायक आजार वेगाने पसरत आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोल्हापूरसह अनेक ठिकाणी गिलेन-बॅरे सिंड्रोम पसरत आहे. पुण्यात २०८ रुग्णांना या आजाराची(disease) लागण झाली आहे. यापैकी ४२ रुग्ण पुणे महानगरपालिकेतील आहेत. याशिवाय १२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आजारामुळे राज्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जीबीएस आजार जर गर्दीमुळे आणि संसर्गजन्य असल्याचे स्पष्ट झाले तर आरोग्य यंत्रणा व प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करू असे सुतोवाच देशाचे आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी येथे केले .

तसेच राज्यात अनेक ठिकाणी जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जीबीएसचा हा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, जीबीएस हा आजार जर गर्दीमुळे आणि संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच यात्रा यावर निर्बंध आणण्याबाबत विचार सुरू असल्याचं संकेत प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत.

प्रतापराव जाधव पुढे म्हणाले, जीबीएस आजार मोठ्या प्रमाणात वाढत असून हा आजार काहीसा जीवघेणा ठरत आहे. त्यात जर जीबीएस हा आजार संसर्गजन्य असेल तर तात्काळ अधिकारी डॉक्टर यांची बैठक घेऊन राज्यात होणाऱ्या गर्दीच्या यात्रावर बंदी आणण्याचे संकेत दिले आहेत.

या आजाराबाबत(disease) डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, लोकांना हा आजार जंतू आणि बॅक्टेरियामुळे होत नाही. काही विषाणू अन्नाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्यावेळी हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. जीबीएस पसरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारे दूषित पाणी, अन्न किंवा मांस सेवन केले आहे. ते म्हणाले की, जीबीएस हा केवळ मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने होतो असे म्हणणे चुकीचे आहे. बऱ्याच अंशी हे नक्कीच खरे आहे.

डॉक्टरांनी या आजारापासून बचाव करण्याचा मार्ग सांगितला आहे. ते म्हणाले की, प्रत्येकाने दूषित मांस किंवा उघडे अन्न खाणे टाळावे. जीबीएसचा त्रास होऊ नये म्हणून, फक्त शिजवलेले मांसाहारी पदार्थ खा. डॉक्टरांनी सांगितले की जर त्याचा विषाणू कोंबड्यांमध्ये असेल तरच कोणत्याही व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊ शकतो. चिकन खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संसर्ग होईलच असे नाही.

हेही वाचा :

‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंड हवी’; प्रसिद्ध अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य

सेल्फी घेत असलेल्या मेव्हणीला किस करायला गेला तितक्यात नवरीने जे केले Video Viral

मोठी बातमी! राज्यात डान्सबार कायद्यात बदल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय